Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > एकदा केले की महिनाभर टिकते हे वाटण, भाजी करा चमचमीत आणि फक्त दहा मिनिटांत

एकदा केले की महिनाभर टिकते हे वाटण, भाजी करा चमचमीत आणि फक्त दहा मिनिटांत

easy cooking, food cravings , this gravy lasts for a month. Make vegetables tasty and in just ten minutes : जेवण करणे होईल सोपे. फ्रिजमध्ये साठवा हे वाटण. रोजच्या वापरासाठी खास. भाजी, आमटी होईल अगदी मस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 18:13 IST2025-06-23T18:11:30+5:302025-06-23T18:13:54+5:30

easy cooking, food cravings , this gravy lasts for a month. Make vegetables tasty and in just ten minutes : जेवण करणे होईल सोपे. फ्रिजमध्ये साठवा हे वाटण. रोजच्या वापरासाठी खास. भाजी, आमटी होईल अगदी मस्त.

easy cooking, food cravings , this gravy lasts for a month. Make vegetables tasty and in just ten minutes | एकदा केले की महिनाभर टिकते हे वाटण, भाजी करा चमचमीत आणि फक्त दहा मिनिटांत

एकदा केले की महिनाभर टिकते हे वाटण, भाजी करा चमचमीत आणि फक्त दहा मिनिटांत

भाजीसाठी रोज वेगळे वाटण तयार करायची आता गरज नाही. हे साधे सोपे वाटण एकदा करा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्या.(easy cooking, food cravings , this gravy lasts for a month. Make vegetables tasty and in just ten minutes) महिनाभर टिकते आणि चवीला जबरदस्त आहे. दोन ते तीन चमचे भाजीत घालायचे. बाकी काही घालायची गरज नाही. 


साहित्य 
कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण, काळीमिरी, दालचिनी, जिरे, कोथिंबीर, तेल, लाल तिखट, हळद, धणे पूड, पाणी, मीठ, तमालपत्र  

प्रमाण
८ ते ९ कांदे
६ ते ७ टोमॅटो
७ हिरवी मिरची
आल्याचा लहान तुकडा
७ ते ८ काळीमिरी

कृती
१. आठ ते नऊ कांदे सोलून घ्यायचे. मध्यम आकाराचे कांदे घ्यावेत. कांदे सोलून झाल्यावर त्याचे मोठे तुकडे करायचे. तसेच सहा ते सात टोमॅटो घ्या आणि त्याचेही मोठे तुकडे करुन घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे घ्यायचे. तसेच टोमॅटोचे तुकडे घ्यायचे. हिरवी मिरची घ्यायची. आल्याचा तुकडा घ्यायचा. लसूण सोलायचा आणि आवडीनुसार लसूण घ्यायचा. त्यात कोथिंबीर घालायची. काड्यांसकट घाला.  सगळे पदार्थ वाटून घ्यायचे. छान पेस्ट तयार करायची. थोडे पाणी घातले तरी चालेल. 

२. वाटून झाल्यावर पेस्ट बाजूला काढून ठेवायची. मिक्सरच्या भांड्यात काळीमिरी घ्यायची. त्यात वेलची घालायची. तसेच दालचिनी घालायची. जिरे घालायचे. मसाला वाटून घ्यायचा. व्यवस्थित वाटून घ्यायचा. सरसरीत वाटा.

३. कढईत दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात तमालपत्राची दोन पाने परतायची. मग त्यात वाटलेले कांदा टोमॅटोचे मिश्रण घालायचे. छान परतायचे. एका वाटीत दोन चमचे लाल तिखट घ्यायचे. त्यात चार ते पाच चमचे धणे पूड घालायची. मीठ घालायचे. त्यात थोडे पाणी ओतायचे. पेस्ट तयार करायची. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. मग तयार केलेला मसाला कढईत ओतायचा. मग वाटण मस्त परतायचे. थोडावेळ झाकून ठेवायचे. जरा आटले की ढवळायचे आणि परतायचे. छान खमंग वास सुटेल. मग गॅस बंद करायचा. वाटण हवाबंद डब्यात काढून ठेवायचे. 
फ्रिजमध्ये १५ दिवसांसाठी चांगले राहते. तसेच फ्रिझरमध्ये महिनाभर चांगले राहते.          

Web Title: easy cooking, food cravings , this gravy lasts for a month. Make vegetables tasty and in just ten minutes