Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > टपरीवर मिळतो तसा उकाळा घरी करण्यासाठी फक्कड रेसिपी, चवीला लय भारी-तलफ न्यारी!

टपरीवर मिळतो तसा उकाळा घरी करण्यासाठी फक्कड रेसिपी, चवीला लय भारी-तलफ न्यारी!

easy and tasty recipes, simple recipe to make Ukala at home, just like the one you get at the stall, the taste is amazing : घरी करा मस्त चविष्ट उकाळा. पौष्टिकही असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 09:29 IST2025-09-19T09:28:51+5:302025-09-19T09:29:59+5:30

easy and tasty recipes, simple recipe to make Ukala at home, just like the one you get at the stall, the taste is amazing : घरी करा मस्त चविष्ट उकाळा. पौष्टिकही असतो.

easy and tasty recipes, simple recipe to make Ukala at home, just like the one you get at the stall, the taste is amazing | टपरीवर मिळतो तसा उकाळा घरी करण्यासाठी फक्कड रेसिपी, चवीला लय भारी-तलफ न्यारी!

टपरीवर मिळतो तसा उकाळा घरी करण्यासाठी फक्कड रेसिपी, चवीला लय भारी-तलफ न्यारी!

टपरीवाल्याकडे चहा प्यायला येणारा वर्ग जास्त असला तरी आणखी एक पदार्थ टपरीवर लोकं आवर्जून मागवतात, तो म्हणजे उकाळा. चवीला एकदम मस्त लागतो. तसेच आरोग्यासाठी चांगला असतो. टपरीवाला दादा एकदम मस्त गरमागरम आणि जिभेला आवडेल असा उकाळा करतो. खरे तर घरी अगदी तसाच उकाळा करणे अगदी सोपे आहे. (easy and tasty recipes, simple recipe to make Ukala at home, just like the one you get at the stall, the taste is amazing) उकाळा पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हा एक पारंपरिक घरगुती उपाय असून सर्दी-खोकला, अंगदुखी, थकवा यावर उपयुक्त ठरतो. उकाळा शरीरात उष्णता निर्माण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि पचनशक्ती सुधारतो. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यात मदत करतो. नैसर्गिक हर्ब्स व मसाल्यांनी तयार केल्यामुळे तो पूर्णपणे रसायनमुक्त असतो. उकाळा हा गावाकडे आणि शहरातही लोकप्रिय असून आजच्या जलद जीवनशैलीत रोगांपासून बचावासाठी एक चविष्ट असा हा उपाय आहे. योग्य प्रमाणात उकाळा प्यायल्याने सर्दी-तापासारख्या त्रासांपासून बचाव होतो आणि शरीर निरोगी राहते.

घरीच मस्त चविष्ट गरमागरम उकाळा तयार करण्यासाठी मोजून १५ मिनिटे लागतात. तुम्हीही असा उकाळा नक्की करुन पाहा. ,सगळ्यांनाच आवडेल. तसेच चहापेक्षा उकाळा पिणे कधीही चांगले. 

साहित्य 
हळद, चहा मसाला, साखर, वेलची, दूध, पाणी, काजू, बदाम , सुंठ पूड 

कृती
१. एका पातेल्यात एक कप पाणी घ्या. तसेच एक कप दूध घ्या. चांगले उकळू द्या. ते उकळल्यावर त्यात चमचाभर चहा मसाला घाला. विकतचा चहा मसाला घाला किंवा घरी तयार केलेला घाला. चमचाभर वेलची पूडही घाला. त्यात चवी नुसार साखर घाला. दोन चमचे हळद घाला. चमचाभर सुंठ पूड घाला. त्यामुळे चव एकदम मस्त येईल. 

२. काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करायचे. उकाळा किमान दहा मिनिटे तरी उकळू द्यायचा. मस्त उकळला की त्याची चव खुप मस्त लागते. उकळून आटला आणि अर्धा झाला की गॅस बंद करायचा. त्यात काजू बदाम घालायचे. गरमागरम उकाळा प्यायचा.  

Web Title: easy and tasty recipes, simple recipe to make Ukala at home, just like the one you get at the stall, the taste is amazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.