>फूड > ड्रायफ्रुट चाट! सुकामेव्याला द्या मस्त स्पाईसी तडका, अशी रेसिपी सुरेख...

ड्रायफ्रुट चाट! सुकामेव्याला द्या मस्त स्पाईसी तडका, अशी रेसिपी सुरेख...

How to make Dry fruit chat: कधी कधी ड्रायफ्रुट्स नुसते खाण्याचा कंटाळा येताे... म्हणूनच तर ही घ्या एक मस्त रेसिपी.. सकाळचा ब्रेकफास्ट किंवा मग दुपारच्या चहासोबत इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून ही रेसिपी बेस्ट आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 02:40 PM2022-01-21T14:40:57+5:302022-01-21T14:42:02+5:30

How to make Dry fruit chat: कधी कधी ड्रायफ्रुट्स नुसते खाण्याचा कंटाळा येताे... म्हणूनच तर ही घ्या एक मस्त रेसिपी.. सकाळचा ब्रेकफास्ट किंवा मग दुपारच्या चहासोबत इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून ही रेसिपी बेस्ट आहे...

Dry fruit chat! tasty and healthy recipe for breakfast and evening snacks | ड्रायफ्रुट चाट! सुकामेव्याला द्या मस्त स्पाईसी तडका, अशी रेसिपी सुरेख...

ड्रायफ्रुट चाट! सुकामेव्याला द्या मस्त स्पाईसी तडका, अशी रेसिपी सुरेख...

Next
Highlightsरेसिपी अतिशय सोपी असून अवघ्या ५ ते १० मिनिटांत हा पदार्थ तयार होतो.. बघा आणि करा ही मस्त चटकदार, चटपटीत रेसिपी..

ड्रायफ्रुट्स खाणं आरोग्यासाठी किती गरजेचं आहे, हे आपण सगळे जाणतोच... थंडीत तर शरीरात उब निर्माण होण्यासाठी ड्रायफ्रुट्स हमखास खाल्लेच जातात. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की कुणाला फक्त बदाम खायला आवडतात तर कुणाला फक्त काजूच आवडतात. कुणा- कुणाला तर मणुके अजिबातच नको असतात. पण आरोग्याच्या दृष्टीने सगळा सुकामेवा तर पोटात जाणं गरजेचं असतं.. म्हणूनच तर ही घ्या एक भन्नाट रेसिपी (food and recipe).. ड्रायफ्रुट चाट..(dry fruits chat recipe) एकदा करूनच बघा.. घरची मंडळी होतील खुश..

 

ड्रायफ्रुट चाट हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्ता म्हणूनही खाऊ शकता. किंवा मग सायंकाळच्या वेळी चहासोबत काही हलकं फुलकं खायचं असेल तरीही हा पदार्थ त्यासाठीचा उत्तम पर्याय होऊ शकताे. ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या deliciousbygarima या पेजवर शेअर करण्यात आली आहे. रेसिपी अतिशय सोपी असून अवघ्या ५ ते १० मिनिटांत हा पदार्थ तयार होतो.. बघा आणि करा ही मस्त चटकदार, चटपटीत रेसिपी..

 

ड्रायफ्रुट चाटसाठी लागणारे साहित्य
दोन टेबलस्पून तूप, काजू, बदाम, पिस्ते, मणूके आणि मखाना हे सगळे ड्रायफ्रुट्स प्रत्येकी अर्धी- अर्धी वाटी. ब्रोकोली, स्वीटकॉर्नचे उकडलेले दाणे, मशरुम, पनीर, वाटाणे हे सर्व प्रत्येकी अर्धी- अर्धी वाटी, चाट मसाला, मीरेपूड आणि चवीनुसार मीठ.

नेहमीच्या कोशिंबीरी खाण्याचा कंटाळा आलाय? ग्रीन गॉडेस सॅलेड करा, कोशिंबीरीला क्रंची ट्विस्ट

कसं करायचं ड्रायफ्रुट चाट?
How to make Dry fruit chat?

- सगळ्यात आधी गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यानंतर त्यात तूप टाका.
- तूप चांगलं तापलं की त्यात बदाम, काजू, पिस्ते, मणुके टाका आणि ते चांगले परतून घ्या.
- त्यानंतर ते कढईतून बाहेर काढा. आता कढईत मखाना टाका आणि त्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत ते तुपात परतून घ्या.
- परतून झालेले मखाना कढईतून बाहेर काढा आणि आता कढईमध्ये पनीर टाका. पनीर सोनेरी रंगाचे झाले की ते कढईतून बाहेर काढा.


- आता त्यात मशरूम, ब्रोकोली, वटाणे, स्वीटकॉर्न आणि तुम्हाला आणखी ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या टाका.
- सगळ्या भाजा परतून झाल्या की भाज्या आणि ड्रायफ्रुट्स एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यामध्ये थोडीशी मीरेपूड, चाटमसाला आणि चवीनुसार मीठ टाका.
- सगळे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. ड्रायफ्रुट चाट झाला खाण्यासाठी तयार.. 
 

Web Title: Dry fruit chat! tasty and healthy recipe for breakfast and evening snacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.