Join us

ब्लॅक कॉफीची कमाल, दररोज एक कप प्यायल्याने अनेक आजारांपासून मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 15:53 IST

दररोज फक्त एक किंवा दोन कप कॉफी प्यायल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं. तसेच स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्लॅक कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, क्लोरोजेनिक एसिड, पॉलीफेनॉल, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स B2, B3 आणि B4 आहेत. त्यात आढळणारे कॅफिन शरीरात डोपामाइन, सेरोटोनिन आणि नोराड्रीलीईनचं प्रमाण वाढवतं.

ब्लॅक कॉफी प्यायल्याने ताण कमी होतो. यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं, जे शरीरात हॅपी हार्मोन वाढवतं, त्यामुळे थकवा, ताण आणि आळस दूर होतो. दररोज फक्त एक किंवा दोन कप कॉफी प्यायल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं. तसेच स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे फॅट लवकर कमी होतात. जिमला जाण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने एनर्जी मिळते. फॅटी लिव्हर, हेपेटायटीस आणि सिरोसिससारख्या लिव्हरशी संबंधित आजारांशी लढण्यास मदत होते. ब्लॅक कॉफी दररोज प्यायल्याने लिव्हरमध्ये आढळणाऱ्या हानिकारक एन्झाईम्सची लेव्हल कमी होते.

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त ब्लॅक कॉफी प्यायलात तर त्याचा तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. ब्लॅक कॉफीचं सेवन मर्यादेतच करावं. ब्लॅक कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर घातक दुष्परिणाम होऊ शकतात.

नेमकी किती कॉफी प्यावी? 

जर तुम्ही एका दिवसात ५०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेत असाल, तर तुमची सवय ताबडतोब बदला. याशिवाय मानसिक आरोग्य, किडनी आणि थायरॉईडच्या रुग्णांनी ब्लॅक कॉफी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य