Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना लस्सी ना ताक वाढत्या उन्हाळ्यात प्या आंबटगोड पियुष, पारंपरिक महाराष्ट्रीयन पेय- खास श्रीखंडाची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 15:16 IST

Drink sweet tasty Piyush, a traditional Maharashtrian drink - special taste of Shrikhand in the rising summer : उन्हाळ्यात प्या खास पियुष. चवीला मस्त आणि करायला सोपं.

उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढते. ताक, लस्सी, पन्हे, कोकम सरबत यांसोबतच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवडीने प्यायले जाणारे एक खास पेय म्हणजे पियुष. गोडसर, थंड आणि मस्त चव असलेले हे पेय अनेकांना आवडते. (Drink sweet tasty Piyush, a traditional Maharashtrian drink - special taste of Shrikhand in the rising summer)विशेषतः लग्नसमारंभ, पारंपरिक जेवण किंवा उन्हाळ्यातील खास मेनूमध्ये पियुष हमखास पाहायला मिळते.

पियुष हे मुख्यतः श्रीखंड, ताक किंवा दही, साखर आणि वेलची यापासून तयार केले जाणारे पेय आहे. काही ठिकाणी त्यात जायफळ किंवा केशरही घातले जाते. चवीला हे पेय लस्सीसारखे वाटते, पण त्याची चव अधिक रिच आणि सुगंधी असते. थंड करून प्यायल्यास पियुष अधिक चवदार लागते.

या पेयाची खास गोष्ट म्हणजे त्याचा मऊ आणि क्रीमी टेक्स्चर. श्रीखंडामुळे त्याला गोडवा आणि घट्टपणा मिळतो, तर ताक किंवा दह्यामुळे त्यात हलका आंबटपणा येतो. त्यामुळे गोड चवीचा छान समतोल तयार होतो. काही लोक वरून ड्रायफ्रूट्स किंवा केशर घालूनही ते सजवतात. पाहा पियुष करण्याची सोपी रेसिपी. 

साहित्य 
दही, वेलची, साखर, पाणी, जायफळ, केसर, दूध

कृती
१. ताजं गोड दही घ्यायचं. पातळ कपड्यात बांधा. त्याचं पाणी काढून टाका. भांड्यात ठेवा त्यावर जड वस्तू ठेवा  आणि फ्रिजला ठेवून द्या. दह्यातलं पाणी निघून जातं आणि त्याचा घट्ट असा चक्का तयार होतो. श्रीखंडासाठी करता अगदी तसंच करायचं.  तो एका चाळणीत घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीने त्यावर जोर देत ते मिश्रण पातळ करुन घ्यायचं. फेटून घ्यायचे. जरा मऊ करायचे. अगदी मऊ होत नाही तोपर्यंत फेटत राहायचे. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात साखर घ्यायची. त्यात वेलची घालायची. आणि त्याची पावडर वाटून घ्यायची. वेलचीचा सुगंध असलेली पिठीसाखर तयार होते. एका वाटीत गरम दूध घ्यायचं. त्यात थोडं केसर घालायचं. केसर दुधात छान एकजीव झालं की ते मऊ दह्याच्या मिश्रणात मिक्स करायचे. त्यात गरजेनुसार पिठीसाखर घालायची. पुन्हा मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटायचे. श्रिखंडच तयार होतं. त्यात थोडं जायफळ किसून घालायचे.

३. एका पातेल्यात दही घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि ताक तयार करायचे. घुसळून छान गोडसर ताक तयार करायचे. आता श्रिखंडात हळूहळू ताक ओतत राहायचे. आणि एकीकडे ढवळत राहायचे. छान मध्यम पातळ आणि मऊ - क्रिमी असे पेयं तयार करायचं. फ्रिजमध्ये ठेवायचं आणि थंडगार करुन प्यायचं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: Enjoy Piyush, a Refreshing Maharashtrian Summer Drink

Web Summary : Piyush, a sweet and tangy Maharashtrian drink, is perfect for summer. Made with shrikhand, yogurt, and spices, it offers a creamy, cooling respite from the heat. Enjoy this traditional beverage at weddings or as a tasty treat.
टॅग्स :समर स्पेशलपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स