हॉट चॉकलेट हे कुणाच्याही मनाला लगेच आनंद देणारं पेय आहे. विशेषत: लहान मुलांसाठी तर हे अगदी जादूई पेयच! चॉकलेटची गोड, चव आणि गरमागरम द्रवाचा स्पर्श मुलांना नक्कीच आवडतो. (Drink nutritious hot chocolate in the cold evening - make hot chocolate drink at home in five minutes)अभ्यास झाल्यावर, खेळून आलेल्या थकव्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या हातात हॉट चॉकलेटचा कप आला की दिवसाची सारी धांदल विसरायला एक क्षण पुरतो.
हॉट चॉकलेटमध्ये असणारे नैसर्गिक कोको शरीराला हलका ऊर्जा पुरवठा करतो. त्यातील थिओब्रोमीन नावाचा घटक मेंदूला शांत करण्याचे काम करतो, तर दुधामुळे मिळणारे कॅल्शियम आणि प्रोटीन्स मुलांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे हे पेय चवदार असण्याबरोबरच थोडे आरोग्यदायीही आहे. त्यात शक्यतो साखरच घातली जाते मात्र या पद्धतीने करुन पाहा. आरोग्यासाठी अजिबात वाईट ठरणार नाही.
स्त्रियांना पाळीच्या दिवसांतही हॉट चॉकलेट हा पदार्थ दिलासा देतो. पाळीदरम्यान चिडचिड, मूड-स्विंग्ज, पोटावर ताण किंवा वेदना यामुळे शरीराला हवं असतं काहीतरी आराम देणारं, उबदार आणि आनंददायी. हॉट चॉकलेटमधील कोको सेरोटोनिन वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे मूड सुधारतो. त्यामुळे हॉट चॉकलेट हे मनाला शांत करणारे पेय ठरते. पाहा कसे करायचे.
साहित्य
कोको पावडर, दूध, ओट्स, खजूर
कृती
१. खजूराच्या बिया काढून घ्यायच्या. एक कप हॉट चॉकलेटसाठी तीन खजूर खुप झाले. खजूर आणि चमचाभर ओट्स थोड्या दुधात भिजवायचे. १५ ते २० मिनिटे भिजवायचे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात खजूर आणि ओट्सचे मिश्रण घ्यायचे. त्यात थोडे अजून दूध घालायचे. छान पेस्ट तयार करायची. जरा घट्टच ठेवा अतिपातळ नको.
२. एका पातेल्यात तयार पेस्ट ओता आणि उकळा. त्यात चमचाभर कोको पावडर घालायची आणि छान एकजीव करायची. सतत ढवळत राहायचे आणि दूध जरा आटू द्यायचे. थोड्या वेळाने दूध थोडे घट्ट होईल मग गरमागरम हॉट चॉकलेट कपमध्ये ओतायचे.
