Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात ताजे मटार खाऊन पोट फुगतं-जुलाब होतात? चुकते मटार खाण्याची पद्धत- ‘असे’ मटार खा मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2025 17:16 IST

Does eating fresh peas in winter causes bloating and diarrhea? then you are eating peas in wrong way - Eat peas like this : मटारचे ताजे दाणे आरोग्यासाठी चांगले असतात. पाहा कसे खावे.

हिवाळा आला की बाजारात भरपूर प्रमाणात दिसणारा ताजा मटार हा खरोखरच पोषणाचा खजिना आहे. चवदार, हलका आणि पचायलासुद्धा सोपा असल्यामुळे तो घराघरात अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण मटार खरोखर शरीराला पूर्ण फायदा देण्यासाठी तो योग्य प्रकारे खाणे महत्त्वाचे आहे. (Does eating fresh peas in winter causes bloating and diarrhea? then you are eating peas in wrong way - Eat peas like this)चुकीच्या पद्धतीने शिजवला, तळला किंवा जास्त तेलात परतला तर त्यातील निम्म्यापेक्षा जास्त पोषणमूल्य निघून जाते. म्हणूनच मटार खाण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे वाफवून किंवा हलका उकडून खाणे.

वाफवलेल्या किंवा उकडलेल्या मटारामध्ये त्याचा जाता रंग, सुगंध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातील विटामिन्स टिकून राहतात. उकडताना जास्त पाणी न वापरणे आणि जास्त वेळ उकडू न देणे हेही तितकेच महत्त्वाचे. हलका मऊपणा येईल इतपत मटार शिजला की तो लगेच खाण्यास योग्य ठरतो. अशा पद्धतीने शिजवलेला मटार सॅलडमध्ये, सुपमध्ये, पुलावमध्ये किंवा फक्त थोडे मीठ-लिंबूसोबतही खाल्ला तरी उत्तम लागतो. शिवाय तेलात परतलेल्या किंवा तळलेल्या मटाराच्या तुलनेत हा प्रकार अतिशय हलका आणि शरीराला लवकर पचणारा असतो. तळून काढल्यावर त्या मटारची चव छान लागते पण त्यातून पोषण निघून जाते.

मटार हा प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी तो एक उत्तम प्रोटीन सोर्स मानला जातो. त्यात विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, तसेच B-कॉम्प्लेक्स ग्रुपमधील अनेक जीवनसत्वे असतात. त्याशिवाय फायबर, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि अँटी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात मिळतात. फायबर जास्त असल्यामुळे मटार पचन सुधारणारा आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करणारा ठरतो. अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास, त्वचा तजेलदार ठेवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

नियमितपणे योग्य पद्धतीने मटार खाल्ल्यास पचन सुधारते, शरीराला ऊर्जेची कमतरता भासत नाही, हाडे मजबूत राहतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यास मदत होते. विशेष म्हणजे वाफवलेला किंवा उकडलेला मटार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य असतो. म्हणून पुढच्या वेळी मटार घरात आणलात तर जास्त तळणे, परतणे किंवा मसालेदार पदार्थात करण्यासाठी वापरणे टाळा. फक्त वाफवून किंवा उकडून खाल्लात तर त्याचे खरे पोषण मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat peas right way this winter for health benefits.

Web Summary : Steaming or boiling peas preserves nutrients lost when frying. Peas are a great source of protein, vitamins, and fiber, aiding digestion and immunity. Enjoy them in salads or soups for maximum health benefits.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्सहिवाळ्यातला आहारकिचन टिप्स