Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरा चहा कडू लागतो? ‘असा’ करा चहा-नेहमीचा मसाला चहा विसराल इतका भारी-कडक टक्करच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 15:33 IST

Does black tea taste bitter? Make it like this - you'll forget about regular masala tea : कोरा चहा करायची सोपी पद्धत. पाहा कसा करायचा.

भारतात चहा हा फक्त एक पेय नाही, तर दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सकाळची सुरुवात असो, दुपारची विश्रांती असो किंवा संध्याकाळच्या गप्पा चहा हा भारतीय संस्कृतीचा एक जिवंत धागा आहे. घरात, ऑफिसमध्ये, रस्त्याच्याकडेला असलेल्या छोट्या टपरीवर चहाचा सुगंध जिथेही पसरतो, तिथे एक वेगळाच आपलेपणा निर्माण होतो. (Does black tea taste bitter? Make it like this - you'll forget about regular masala tea.)पारंपरिक दूध - साखर घातलेल्या चहासोबतच कोरा चहा देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.  कोरा चहा शरीराला हलके वाटण्यास, थकवा कमी करण्यास आणि मन शांत ठेवण्यात मदत करतो, असे अनेकांना अनुभवातून जाणवते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील ताणतणावातही हा पेय प्रकार एक छोटीशी शांतता देतो.

भारतातील विविध राज्यांमध्ये चहाचे वेगवेगळे रंग आणि चवी लोकांपर्यंत पोहोचतात. असमचा दमदार काळा चहा, दार्जिलिंगचा हलका सुगंधी चहा असे विविध प्रकारचे चहा चवीला मस्त असतात. महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांत कोरा चहा जास्त प्रमाणात प्यायला जातो. गावोगावी कोरा चहा आवडीने प्यायला जातो. कोरा चहा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. कोरा चहा कडू होतो, म्हणून करणे टाळत असाल तर पाहा काय करायला हवे. या पद्धतीने करायचा म्हणजे मस्त होतो.  

साहित्य चहा पूड, साखर, वेलची, आलं, तुळस, काळीमिरी, पाणी, पाती चहा 

कृती१. एका पातेल्यात पाणी घ्यायचे. पाणी छान उकळून घ्यायचे. त्यात किसलेले आले घालायचे. नंतर त्यात वेलची घालायची. ठेचलेली काळीमिरी घालायची आणि व्यवस्थित उकळायची. त्यात तुळशीची पाने घालायची. 

२. सगळे पदार्थ छान उकळले की त्यात पाती चहा घालायचा. साखर घालायची आणि उकळायचे. पाण्याचा रंग जरा हिरवट झाला की थोडी चहा पूड घालायची. तीन कप चहासाठी एक चमचा पूड भरपूर होते. दोन मिनिटे चहा पूड उकळायची. जास्त उकळू नका. चहा अगदी कडू होतो. छानपैकी चहा गाळायचा आणि गरमागरम प्यायचा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Make flavorful black tea; forget masala chai with this recipe!

Web Summary : Black tea is a popular beverage in India, known for its health benefits. This recipe details how to make delicious black tea with ingredients like ginger, cardamom, and basil, avoiding bitterness. Enjoy a flavorful, hot cup!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स