Heart Healthy Cooking Oils: भारतीय आहारात तेलाला फार महत्व आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. आरोग्याचा विचार करता भाजी बनवताना योग्य तेलाची निवड फार महत्त्वाची असते. कारण रोजच्या स्वयंपाकात वापरलं जाणारं तेल केवळ चवच नाही तर आपल्या आरोग्याचाही निर्णय घेतं. चुकीचं तेल वापरल्यास हृदयासह संपूर्ण शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
हल्ली काही लोकांमध्ये महागडं ऑलिव्ह ऑइल वापरण्याचा ट्रेंड असला तरी, भारतीय स्वयंपाकघरात अशी अनेक देशी तेलं आहेत जी हृदयासाठी अधिक सुरक्षित आणि उपयुक्त मानले जातात. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांच्या मते, प्रत्येक तेल आरोग्यासाठी सारखं नसतं. खासकरून भारतीय आहार पद्धतीसाठी योग्य तेल निवडणं हार्ट हेल्थसाठी अत्यंत गरजेचं आहे.
डॉ. चोप्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय किचनसाठी पाच सर्वोत्तम तेलं सांगितली आहेत. ही तेलं कोणत्या ट्रेंडवर नाही, तर शास्त्रीय अभ्यास आणि पोषणमूल्यांच्या आधारावर निवडलेली आहेत. त्यांच्या मते, तूप, खोबऱ्याचं तेल, मोहरीचं तेल, तीळ तेल, शेंगदाणा तेल ही तेलं भारतीय जेवणासाठी सर्वाधिक योग्य मानली जातात. ही पारंपरिक स्वयंपाक पद्धतींना अनुरूप असून शरीराला नुकसानही पोहोचवत नाहीत.
योग्य कुकिंग ऑइल निवडणं हा केवळ चवीचा विषय नाही, तर हृदयाचं संरक्षण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. रिफाइंड तेलांमध्ये असलेले ट्रान्स फॅट्स दीर्घकाळात हार्ट डिजीजचा धोका वाढवू शकतात. डॉ. चोप्रा सांगतात की भारतीय जेवण अनेकदा उच्च तापमानावर आणि भरपूर मसाल्यांसह शिजवलं जातं. त्यामुळे अशी तेलं वापरणं गरजेचं आहे, जी जास्त उष्णता सहन करू शकतील आणि त्यांचे पोषक घटक नष्ट होणार नाहीत.
डॉ. चोप्रा यांच्या मते, रोजच्या स्वयंपाकासाठी महागडी परदेशी तेलं वापरण्याची गरज नाही. योग्य प्रमाणात वापरलेली देशी व पारंपरिक तेलं चव आणि हृदयाचं आरोग्य – दोन्हीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
