How to store Pickle : आपण पाहिलं असेल की पूर्वी घरी तयार केलेलं लोणचं चीनी मातीच्या बरणीत स्टोर करून ठेवलं जात होतं. जे वर्षभर चांगलं राहत होतं. पण आजकाल लोक सोयीनुसार प्लास्टिकच्या डब्यांमध्ये लोणचं स्टोर करतात. इतकंच नाही तर बाजारात देखील प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पॅक्ड लोणचंच मिळतं. पण हीच आपली एक मोठी चूक आहे. असं करणं आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर आपणही प्लास्टिकच्या डब्यात लोणचं (Pickle In Plastic Jar) ठेवत असाल तर लगेच त्यातून बाहेर काढा. हा आमचा नाही तर डॉक्टरांचा सल्ला आहे.
डॉक्टर तरंग कृष्णा सांगतात की, लोणच्यामध्ये मीठ, तेल आणि मसाल्यांचं प्रमाण अधिक असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यातून बीपीए आणि फ्थेलेट्सारखे नुकसानकारक केमिकल निघू लागतं. या केमिकलला एंडोक्राइन डिसरप्टर्स म्हणतात. म्हणजे यानं शरीरातील हार्मोन्समध्ये गडबड होते. हेच कारण आहे जास्त काळ असे केमिकल्स शरीरात जास्त असेल तर हार्मोनल असंतुलन, थायरॉइड आणि इतकंच नाही तर काही प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो.
तेल आणि मिठानं वाढतो धोका
लोणच्यामधील तेल आणि मीठ प्लास्टिकमधून निघणाऱ्या विषारी केमिकल्सना अधिक वेगानं खेचून घेतात. म्हणजे हे केमिकल्स लोणच्यामध्ये हळूहळू मिक्स होऊ लागतात. मग ते आपल्या शरीरात जातात. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात.
योग्य पद्धत काय?
जर आपल्या लोणच्याची टेस्टही कायम ठेवायची असेल आणि तब्येतही चांगली ठेवायची असेल तर ते चीनी मातीच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीत स्टोर करा. ही भांडी लोणच्याची टेस्ट आणि पोषण कायम ठेवतात. तसेच यातून कोणतेही केमिकल्स निघत नाहीत.
पूर्वी जेव्हा प्लास्टिकचा शोध लागला नव्हता, तेव्हा लोक आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती निवड करत होते. हीच जुनी शिकवण आजही विज्ञान योग्य ठरवते. त्यामुळे रोज आपल्याला हवं असणारं चटपटीत लोणचं नेहमी चीनी मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या बरणीतच स्टोर करा.
