Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोजच प्लास्टिकची बाटली आणि डबा वापरता? मग हे पदार्थ डब्यात भरणे टाळा, आरोग्यासाठी हानिकारक कारण ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 08:45 IST

Do you use plastic bottles and containers every day? Then avoid putting these items in containers, because they are harmful to health : प्लास्टिकच्या डब्यात अजिबात भरु नका हे पदार्थ.

आजकाल घराघरांत प्लास्टिकचे डबे आणि बाटल्या मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हलके, न तुटणारे आणि स्वस्त असल्यामुळे ते सोयीचे वाटतात. पण प्रत्येक प्रकारचा पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवणे सुरक्षित असतेच असे नाही. (Do you use plastic bottles and containers every day? Then avoid putting these items in containers, because they are harmful to health....)चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास अन्नाची चव बदलू शकते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आणि बाटल्यांमध्ये कोणते पदार्थ ठेवणे टाळावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम गरम पदार्थ थेट प्लास्टिकच्या डब्यात ठेवणे टाळावे. नुकताच गॅसवरून उतरवलेला भात, आमटी, भाजी किंवा सूप गरम असतानाच प्लास्टिकमध्ये भरल्यास उष्णतेमुळे प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळण्याची शक्यता असते. विशेषतः स्वस्त किंवा दर्जाहीन प्लास्टिकमध्ये हा धोका अधिक असतो. त्यामुळे पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावरच प्लास्टिकमध्ये ठेवावेत किंवा शक्य असल्यास स्टील, काचेचे भांडे वापरावे. म्हणूनच चहा कॉफी पार्सल घेणे टाळा असे तज्ज्ञ कायम सांगतात. 

अम्लीय (आंबट) पदार्थही प्लास्टिकमध्ये साठवताना काळजी घ्यावी. लिंबाचा रस, चिंचेचे पाणी, टोमॅटोची ग्रेव्ही, आमटी किंवा लोणचे यांसारखे पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवल्यावर त्यातील गुणधर्म कार्यरत होतात. त्यामुळे चव बदलू शकते आणि प्लास्टिकचा वास अन्नाला येऊ शकतो. अशा पदार्थांसाठी काचेचे किंवा स्टीलचे डबे अधिक योग्य ठरतात.

तेलकट आणि मसालेदार पदार्थदेखील प्लास्टिकमध्ये दीर्घकाळ ठेवणे टाळावे. तेलामुळे प्लास्टिकचा पृष्ठभाग हळूहळू खराब होऊ शकतो. काही वेळा डब्याला पिवळसर डाग पडतात आणि त्यातून वासही येऊ लागतो. त्यामुळे जास्त तेलकट किंवा फ्राय केलेले पदार्थ प्लास्टिकऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवणे सुरक्षित ठरते.

गरम पाणी किंवा उकळते पाणी प्लास्टिकच्या बाटलीत भरू नये. अनेक जण प्रवासात गरम पाणी ठेवण्यासाठी साधी प्लास्टिक बाटली वापरतात, पण त्यामुळे प्लास्टिक मऊ होऊन त्यातील घटक पाण्यात मिसळू शकतात. त्यासाठी खास गरम पाण्याच्या बाटल्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरणे योग्य आहे.

तसेच जुने, तडा गेलेले प्लास्टिकचे डबे वापरणे टाळावे. अशा डब्यांच्या छोट्या भेगांमध्ये जंतू साचू शकतात आणि ते पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे अशा डब्यांचा वापर थांबवून नवीन, फूड-ग्रेड आणि बीपीए-फ्री (BPA-free) प्लास्टिक निवडणे चांगले.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these foods in plastic containers for better health.

Web Summary : Avoid storing hot, acidic, oily foods, or hot water in plastic containers. Use glass or steel instead. Discard old, cracked containers for food safety.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोम रेमेडीहेल्थ टिप्स