चहा हा पदार्थ भारतात फार लोकप्रिय आहे. त्यात अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे गुळाचा चहा. गुळाचा चहा हा पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय म्हणून ओळखला जातो. साखरेऐवजी गूळ वापरुन तयार होणारा हा चहा चवीला वेगळा, सौम्य गोड आणि शरीराला उब देणारा असतो. (Do you like jaggery tea? See the perfect timing of adding jaggery to the tea, the tea will taste good)ग्रामीण भागात आणि आयुर्वेदिक पद्धतीत गुळाच्या चहाला विशेष महत्त्व दिलं जातं. हा चहा पौष्टिक वगैरे मानण्याला अनेक डॉक्टर विरोध करतात. मात्र रोजच चहा पिणाऱ्यांनी साखरेऐवजी वेगळे काहीतरी म्हणून ही रेसिपी नक्की करुन पाहावी. शरीराला छान असा उबदारपणा हा चहा देतो. त्यामुळे नक्की प्या.
गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो आणि तो साखरेपेक्षा जड नसतो. त्यामुळे गुळाचा चहा प्यायल्यानंतर गोडामुळे लगेच आळस येत नाही. उलट शरीराला थोडी ऊर्जा मिळाल्यासारखी वाटते. थंडीच्या दिवसांत गुळाचा चहा शरीराला आतून उब देतो आणि गारवा कमी करण्यास मदत करतो, म्हणूनच हिवाळ्यात अनेक घरांमध्ये हा चहा आवडीने घेतला जातो.
साहित्य
चहा पूड, दूध, गूळ, आलं, वेलची, पाणी
कृती
१. एका पातेल्यात कपभर पाणी घ्यायचे. पाणी गरम करत ठेवायचे. त्यात थोडी वेलची घालायची. तसेच किसलेले आले घालायचे. जरा उकळून घ्यायचे. मग त्यात थोडी चहा पूड घालायची. मस्त उकळून घ्यायची. चहा छान उकळला की त्यात दूध घालायचे. दुधही उकळून घ्यायचे.
२. सगळ्यात शेवटी त्यात किसलेला गूळ घालायचा. बाजारात गूळ पावडर मिळते. तिचा वापर करणे जास्त सोयीस्कर ठरते. गूळ सगळ्यात शेवटी घालणे गरजेचे आहे. आधी घातले तर दूध फाटण्याची शक्यता असते. गूळ विरघळेपर्यंत चहा उकळायचा. नंतर गाळून घ्यायचा. गुळाचा चहा चवीलाही वेगळा लागतो.
