वरण म्हणजे आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा आणि पौष्टिक घटक आहे. डाळीपासून केले जाणारे वरण केवळ चवीला नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त असते. यात प्रथिने, लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. डाळीमुळे शरीराला ऊर्जा मिळते, स्नायू मजबूत राहतात आणि पचन सुधारते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वरण हे हलके आणि पोटभरीचे मानले जाते. (Do you know what goes wrong while cooking lentils? remember 2 tips while cooking lentils )त्यामुळे आहारात एखादी डाळ रोज असायलाच हवी. वरण, भात, तूप आणि लिंबू हा आहार भारतात सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. इथल्या वातावरणासाठी हा आहार एकदम मस्त मानला जातो.
वरण करताना काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर वरण चविष्ट आणि नीट शिजलेले होते. प्रथम, डाळ धुताना ती दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवा, म्हणजे त्यातील धूळ आणि अतिरिक्त स्टार्च निघतो. वरणासाठी साधारण तूर डाळ, मूग डाळ किंवा मसूर डाळ वापरली जाते. डाळ शिजवण्यापूर्वी ती १५-२० मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा, त्यामुळे ती लवकर आणि मऊ शिजते. वरण जरी पौष्टिक आणि चविष्ट असले तरी ते बधतेसुद्धा. पित्त आणि गॅसेसचे प्रमाण वरणामुळे वाढते. वरण पचायला काही जणांना जड जाते. सगळ्यांनाच ते लगेच पचत नाही. त्यामुळे वरण शिजवताना दोन स्पेप्स जास्त करुन हा त्रास टाळता येतो.
प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण नीट ठेवा. एक कप डाळीसाठी दोन ते अडीच कप पाणी पुरेसे असते. डाळ शिजवताना काही गोष्टी न चुकता करा म्हणजे डाळ बाधत नाही. थोडी हळद आणि थेंबभर तेल घातल्यास डाळेचा रंग सुंदर राहतो आणि फेस कमी येतो. त्यात चमचाभर हिंग घालायचे. डाळ हिंगासोबत शिजवल्यावर डाळ पचायला हलकी जाते. तसेच गॅसेस होत नाहीत. डाळ शिजल्यानंतर ती चांगली घोटून घ्या आणि थोडे पाणी घाला. जिऱ्याची फोडणी दिली तर चव आणि पोषण दोन्ही वाढते. तुम्हीही रोज वरण भात खात असाल तर या स्पेप्स लक्षात
ठेवा म्हणजे डाळ बाधणार नाही आणि डाएट संतुलित राहील.