शरीराला खनिजे, जीवनसत्त्व, लोह आदी अनेक गुणधर्मांची गरज असते. सगळे एकाच अन्न पदार्थात तर मिळू शकत नाहीत. ( do you know these 7 benefits of almonds? Read, why should you eat almonds..)त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ खातो. त्यात विविध भाज्यांचा समावेश होतो. तसेच फळांचाही होतो. त्याचप्रमाणे विविध प्रकारचा सुकामेवा खाल्याने अनेक सत्व शरीराला मिळतात. ( do you know these 7 benefits of almonds? Read, why should you eat almonds..)अनेक प्रकारांपैकी एक पदार्थ सगळ्यांच्याच घरात असतो. तो म्हणजे बदाम. १६ फेब्रुवारी हा जागतिक बदाम दिवस म्हणून साजरा केला जातो. बदामाचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरूवात झाली.
बदामाला सुपरफूड म्हटले जाते. त्यात प्रथिने, कॅल्शियम, जस्त, आदी अनेक पोषकसत्वे असतात. बदाम खाल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
१. ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास असतो. त्यांच्यासाठी बदाम म्हणजे औषधच. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नीट ठेवण्यासाठी बदाम मदत करतात.
२. हृदयासाठी बदाम खाणे चांगले. विविध हृदय विकारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी बदाम उपयुक्त असतात.
३. मेंदूच्या तल्लखतेसाठी बदाम फायदेशीर असतात. आपल्याकडे कोणी काही विसरलं की, बदाम खा असं म्हणायची पद्धत आहे. कारण बदाम खाल्याने बुद्धीची कार्यक्षमता वाढते. गोष्टी विसरायला होत नाहीत. अभ्यासही लक्षात राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज किमान दोन-चार बदाम खावेत.
४. मधुमेहाची समस्या असल्यास त्यावरही बदाम गुणकारी आहेत. साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी बदामाची मदत होते.
५ . त्वचा चांगली व सतेज राखण्यासाठी बदाम चांगले असतात. तसेच केसांसाठीही फायदेशीर असतात. बदामाचे तेलही बाजारात विकत मिळते. त्याने चेहर्यावर मालीश करा.
६. बदामांमध्ये मॅग्नेशियम असते. म्हणून शरीरातील मॅग्नेशियमची पातळी संतुलित ठेवण्यासाठी बदाम खावेत.
७. बदाम पोटभरीचे असतात. थोडेसे खाल्ले तरी पोटाला आधार मिळतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही बदाम फायदेशीर असतात.
बदाम नुसते खाल्ले तरी चालतात. पण बदामातील पूर्ण सत्व हवे असतील तर, बदाम भिजवून खावे. रात्री झोपण्याआधी बदाम पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठल्यावर ते सोलून खावेत. ३ ते ४ बदाम पुरेसे आहेत.