Join us

Diwali special : बटाटा शेव फराळात हवीच, शेवेचा हा प्रकार सोपा आणि झटपट, करुन तर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2025 12:44 IST

Diwali special: Potato sev is a must-have snack, very easy and quick recipe, try it : फराळासाठी करा अशी मस्त बटाटा शेव.

शेव हा एक लोकप्रिय आणि कुरकुरीत प्रकार आहे. जो घरोघरी तयार केला जातो. त्यात अनेक प्रकार असतात. साधी पिवळी शेव, मसाला शेव, बटाटा शेव, मिरची शेव, लसूण शेव, आणि लाल बेसन शेव इत्यादी. प्रत्येक प्रकाराची चव वेगळी आणि खास असते. (Diwali special: Potato sev is a must-have snack, very easy and quick recipe, try it)या सगळ्यांपैकी बटाटा शेव ही विशेष आवडीने खाल्ली जाते. चवीला छान लागतेच शिवाय कुरकुरीत लागते तसेच हलकी असल्यामुळे चहाबरोबर खाण्यासाठी योग्य ठरते. बटाट्याचा स्वाद आणि मसाल्याची चव खाण्यातील रंगत वाढवते. सण, प्रवास किंवा रोजच्या नाश्त्यासाठीही बटाटा शेव हा उत्तम पर्याय आहे. करायला अगदी सोपी आहे. टिकतेही बरेच दिवस. एकदा नक्की करुन पाहा. दिवाळीच्या फराळासाठी मस्त पर्याय आहे.  

साहित्य बटाटा, बेसन, हळद, लाल तिखट, जिरे पूड, धणे पूड, मीठ ओवा, आमचूर, तेल, पाणी

कृती१. बटाटे छान उकडून घ्यायचे. उकडून झाल्यावर सोलायचे आणि मग किसून घ्यायचे. त्यात तुकडे राहणार नाहीतनयाची काळजी घ्या. बटाटे मस्त कुस्करुन घ्यायचे. त्यात बेसन घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची. थोडे लाल तिखट घालायचे. चमचाभर धणे पूड घालायची. चमचाभर जिरे पूड घालायची. चवी पुरते मीठ घालायचे. 

२. थोडे तेल गरम करायचे. तयार पिठात थोडे मोहन ओतायचे. तसेच अगदी अर्धा चमचा आमचूप पूड घालायची. पाण्याचा हात लावायचा आणि पीठ मळून घ्यायचे. जरा सैलसरच मळा, अति घट्ट मळू नका. पाण्याची गरज नसेल तर पाण्याचा वापर टाळा. 

३. कढईत तेल तापत ठेवा. शेवेच्या पिठाचे गोळे तयार करुन घ्यायचे. शेवपात्रात एक-एक करुन गोळे भरायचे. मध्यम गरम तेलात शेव सोडायची. कुरकुरीत तळून घ्यायची.गार झाल्यावर तोडून बारीक करायची. हवाबंद डब्यात भरुन ठेवायची. म्हणजे मऊ पडणार नाही आणि जास्त दिवस टिकेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Special: Quick and Easy Potato Sev Recipe for Festive Snacking

Web Summary : Potato sev, a crispy and flavorful snack, is perfect for Diwali. This easy recipe uses potato, gram flour, and spices. Enjoy this savory treat with tea or pack for travels; it stays fresh longer.
टॅग्स :दिवाळी २०२५अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स