दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की फराळ आलाच. फराळाच्या पदार्थांमध्ये चिवडा आवर्जून खाल्ला जातो. काहीजण पोह्यांचा चिवडा करतात तर काहीजण कुरमुऱ्यांचा चिवडा. कुरमुऱ्यांचा चिवडा करायला अगदी सोपा आणि चवीला खमंग लागतो. हा चिवडा लवकर नरम पडत नाही. तुम्ही यात फरसाण, शेव, लसूण चिवडा असे बरेच पदार्थ कालवून मग हा चिवडा बनवू शकता. कुरमुऱ्यांचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आणि सतत खात राहाल असा चवदार चिवडा बनेल. (How to Make Murmura Chivda)
कुरमुऱ्यांचा चिवडा करण्याची खास रेसिपी
एका मोठ्या जाड बुडाच्या कढईत कुरमुरे मंद आचेवर भाजून घ्या. कुरमुरे साधारण ५ ते ७ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजा. कुरमुरे हाताने दाबून पाहिल्यास सहज तुटले पाहिजेत. भाजलेले कुरमुरे एका मोठ्या पसरट भांड्यात काढून घ्या. त्याच कढईत तेल गरम करा.
त्यानंतर खोबऱ्याचे काप हलके सोनेरी होईपर्यंत तळून काढून घ्या. डाळं (फुटाण्याची डाळ) हलके तळून घ्या. तळलेले सर्व पदार्थ कढईतून काढून घेतल्यावर, कढईत फक्त १ मोठा चमचा तेल शिल्लक ठेवा. गॅसची आच मंद ठेवा.
दिवाळीसाठी घ्या काचेच्या बांगड्यांचे सुंदर सेट्स; १० प्रकारच्या सुंदर बांगड्या-हात सजतील सणावारी
तेलात मोहरी आणि जिरे घाला. मोहरी तडतडली की लगेच ठेचलेला लसूण (वापरत असाल तर) घालून सोनेरी होईपर्यंत भाजा. आता चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळा. कढीपत्ता ओलसर राहिल्यास चिवडा लगेच नरम पडतो.
कढीपत्ता कुरकुरीत झाल्यावर लगेच हिंग, हळद पावडर आणि धने-जिरे पावडर घाला. मसाला जळू नये म्हणून गॅसची आच एकदम मंद ठेवा किंवा काही सेकंदांसाठी गॅस बंद करा.
गुळाचा चहा बिघडतो-चहात आधी काय घालायचं? ८ टिप्स, फक्कड गुळाचा चहा घरीच बनेल
तयार केलेला हा गरम मसाला लगेचच कुरमुरे आणि तळलेले शेंगदाणे, खोबरे, डाळं असलेल्या भांड्यावर ओता. आता त्यात चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घालून घ्या. एका मोठ्या चमच्याने किंवा हाताने सर्व मिश्रण हळूवारपणे चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाला कुरमुऱ्यांना आणि इतर साहित्याला व्यवस्थित लागेल. चव घेऊन मीठ किंवा पिठी साखर कमी-जास्त करू शकता. चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. यामुळे तो महिनाभर कुरकुरीत राहतो.
Web Summary : Make delicious Murmura Chivda in minutes! Roast murmura, fry coconut and lentils. Temper spices in oil, then mix with murmura, peanuts, and sugar. Store airtight for lasting crispness.
Web Summary : मिनटों में स्वादिष्ट मुरमुरा चिवड़ा बनाएं! मुरमुरे भूनें, नारियल और दालें तलें। तेल में मसाले डालकर मुरमुरे, मूंगफली और चीनी के साथ मिलाएं। लंबे समय तक कुरकुरा रखने के लिए एयरटाइट डिब्बे में स्टोर करें।