Fruit Eating Tips : सामान्यपणे बऱ्याच घरांमध्ये सवय असते की, जेवण झाल्यावर फळं खावीत. लोक वेगवेगळी आपल्या आवडीनुसार फळं खातात. त्यांना असं वाटतं की, जेवण झाल्यावर फळं खाणं हेल्दी असतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण झाल्यावर फळं खाण्याची सवय आपलं आरोग्य बिघडवू शकते. आज आपण हे समजून घेणार आहोत.
साधारणपणे फळं लवकर पचतात, पण शिजवलेलं जेवण हळूहळू पचतं. फळांमध्ये नॅचरल शुगर आणि फायबर असतं, त्यामुळे ती खूप लवकर पचते. चपाती, भात, डाळ, भाजी यांसारख्या शिजवलेल्या अन्नाला पचायला जास्त वेळ लागतो. म्हणून जेवणानंतर लगेच फळं खाल्ली की, फळं पोटात वरच थांबतात आणि त्यांची पचनक्रिया अडून बसते. त्यामुळे पोटात सुरू होतो ‘फर्मेंटेशन’चा खेळ. जड अन्नाच्या खाली अडकलेली फळं फर्मेंट व्हायला वेळ लागतो. यामुळे पोटात गॅस आणि इतर पचनाचे त्रास निर्माण होतात.
पोट फुगणे
जडपणा
गॅस
अजीर्ण
सतत ढेकर किंवा पादणे
आयुर्वेद सांगतं की, हे 'विरुद्ध आहार' आहे. आयुर्वेदनुसार फळं आणि शिजवलेला आहार एकत्र खाल्ल्यास पोटाचं तंत्र बिघडतं, ज्याचा पित्त, कफ आणि वात या तिन्ही दोषांवर नकारात्मक परिणाम होतो.
मग फळं कधी खावीत? योग्य वेळ कोणती?
1) सकाळी उपाशीपोटी
सकाळी फळं खाल्ल्यास लगेच ऊर्जा मिळते. शरीर डीटॉक्स होतं. पचन हलकं आणि सोपं राहतं.
2) दोन जेवणांच्या मध्ये
सकाळी नाश्ता जड केला असेल तर दुपारच्या जेवणाच्या 2–3 तास आधी फळं खाणं उत्तम असतं. या वेळेला पोट हलकं असतं आणि फळं सहज पचतात.
3) सकाळी 11 वाजेपूर्वी सर्वोत्तम वेळ
सकाळी 8 ते 11 या वेळेत शरीर नैसर्गिकरित्या "क्लीन्सिंग मोड" मध्ये असतं. फळं या प्रक्रियेला सपोर्ट करतात आणि दिवसभरासाठी ऊर्जा देतात.
योग्य सवय काय?
फळं मुख्य जेवणापासून वेगळी खावीत
जवणानंतर लगेच नाही
सकाळी उपाशीपोटी किंवा दोन जेवणांच्या मधे खाणं सर्वोत्तम
ही सवय तुमचं पचन सुधारेल आणि गट हेल्थ निरोगी ठेवेल.
