Join us

भाज्या, डाळीला फोडणी देताना ५ पद्धती वापरा; जेवणाची वाढेल रंगत पदार्थ लागेल चवदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 17:37 IST

Different Types of Tadka : तुम्हालाही घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून नवीन काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल तडका देऊन चविष्ट पदार्थ बनवू शकता.

जेव्हाही तुम्ही कोणता पदार्थ बनवता त्यावेळी फोडणी घालण्याच्या पद्धतीवर पदार्थांची चव अवलंबून असते. फोडणीमुळे पदार्थाला नवीन चव येते. फोडणीचा सुगंध पदार्थाला एक नवी चव देतो. नेहमी त्याच त्याच चवीची  भाजी, डाळ  खाऊन कंटाळा आलेला असतो. जर तुम्हालाही घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून नवीन काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही रेस्टॉरंटस्टाईल तडका देऊन चविष्ट पदार्थ बनवू शकता. (Different types of tadka in vegetables raita lentils the taste of food will increase)

मख्खनी तडका

एका तव्यात तूप किंवा  बटर गरम करा. त्यात आलं- लसणाची पेस्ट, टोमॅटो प्यूरी, मीठ, लाल मिरची पावडर आणि थोडीशी साखर घाला.  यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून चव वाढवू शकता.

फक्त वाटीभर तांदूळ वापरून करा सॉफ्ट, जाळीदार डोसे; ही घ्या इंस्टंट, स्वादीष्ट रेसेपी

तिळाची फोडणी

तिळाचे तेल गरम करून त्यात पांढरे किंवा काळे तिळ घाला. डाळ तडकल्यानंतर त्यात शेंगदाणे घालून हलकं शेकून घ्या  आणि मसाला गरम करा.  ही फोडणी तुम्ही डाळ, भात किंवा पुलाव तयार करताना देऊ शकता.  चटणीसाठी अशी फोडणीची पद्धत वापरल्यास चटणी लवकर खराब होत नाही. 

पंजाबी फोडणी

पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात राई, जीरं, बारीक कापलेला कांदा घाला. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात आलं- लसणाची पेस्ट मिसळा. त्यात तुम्ही टोमॅटो, राई, जीरं, हळद, लवंग आणि काळी मिरी घालून शिजवा.  ही फोडणी तुम्ही डाळीत मिसळू शकता.

साऊथ इंडियन फोडणी

या प्रकारची फोडणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यानंतर पॅनमध्ये राई, उडीद  दाळ, कढीपत्ता, गरम करून घ्या. त्यानंतर  फोडणी सांभर, नारळाची चटणी किंवा भातासाठी वापरा.

सुंगधित फोडणीसाठी करा करायचं? 

फेटलेल्या पातळ दह्यावर तमालपत्र ठेवा. लाकडी कोळश्याचा तुकडा गॅसवर गरम करून घ्या. कोळसा गरम झाल्यानंतर चुटकीभर हिंग, जीर आणि राई घाला. मोहोरी तडकल्यानंतर २ ते  ३ थेंब तूप घाला. कोळश्याचे तुकडे तमालपत्रावर ठेवा आणि रायता पाच मिनिटांसाठी झाका. त्यानंतर उघडून जेवण सर्व्ह करा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न