Join us

बीट खाल्ल्यानेही होतात ५ त्रास-बिघडते तब्येत, कारण तुम्ही बीट चुकीच्या पद्धतीने खाता-पाहा योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:15 IST

Right way to eat Beetroot : जास्तीत जास्त लोक बीट चुकीच्या पद्धतीनं खातात. असा दावा आमचा नाही तर डायटिशिअन भावेश गुप्ता यांचा आहे.

Right way to eat Beetroot :  बीट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं कंदमूळ मानलं जातं. कारण यात भरपूर पोषक तत्व असतात. लाल रंगाच्या या कंदमूळात प्रोटीन, कार्ब्स, नॅचरल शुगर, फायबर आणि पाणी असतं. जर नेहमीच बीट खाल्लं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा बीट योग्य पद्धतीनं खाल.

जास्तीत जास्त लोक बीट चुकीच्या पद्धतीनं खातात. असा दावा आमचा नाही तर डायटिशिअन भावेश गुप्ता यांचा आहे. भावेश गुप्ता यांच्यानुसार, जर बीट सलाद किंवा ज्यूसच्या रूपात घेत असाल तर आजच बंद करा. कारण बीट खाण्याच्या या चुकीच्या पद्धती आहेत. सोबतच ते सांगतात की, यात आयर्नही खूप कमी असतं. अशात कच्चं बीट खाल्ल्यानं काय होतं ते पाहुयात.

पोट बिघडू शकतं

डायटिशिअननुसार, बीट एक कंदमूळ आहे. जे जमिनीत वाढतं. त्यामुळे यात काही नुकसानकारक व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅरासाइट असतात. ज्यामुळे डायरिया, उलटी, फूड पॉयजनिंग इतकंच काय तर गर्भपातही होऊ शकतो.

लिव्हर, किडनी, हृदयासाठी घातक

घातक मायक्रोब्सशिवाय बिटामध्ये हेवी मेटल आणि पेस्टीसाइडही असतात. जे आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव जसे की, लिव्हर, किडनी आणि हृदय डॅमेज करू शकतात. त्यामुळे आधीच या अवयवासंबंधी काही समस्या असेल तर बीट खाऊ नये.

बीट खाण्याचे नुकसान

किडनी स्टोनचा धोका

कच्च्या बिटामध्ये ऑक्सालेटचं प्रमाण खूप जास्त असतं. हे एकप्रकारचं अॅंटी-न्यूट्रिएंट असतं, जे कॅल्शिअमसोबत मिक्स झाल्यावर पचनासंबंधी समस्या करतं. तसेच कॅल्शिअम आणि ऑक्सालेट एकत्र झाल्याव किडनीमध्ये स्टोन तयार होतात.

फार कमी असतं आयर्न

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, बीट खाल्ल्यानं रक्त वाढतं. पण १०० ग्रॅम बिटामध्ये १ मायक्रोग्रॅमपेक्षाही कमी आयर्न असतं. डायटिशिअननुसार, यापेक्षा अधिक जास्त आयर्न पालक आणि भोपळ्याच्या बियांमध्ये असतं.

बीट खाण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी तर बीट पाण्यानं चांगलं धुवून घ्या. नंतर त्याची साल काढून उकडून घ्या किंवा शिजवा. असं केल्यानं बिटातील घातक तत्व नष्ट होतात. सोबतच पोटासंबंधी समस्याही होत नाहीत. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य