Chapati Calories : भारतात जेवणाचं ताट हे चपातीशिवाय अपूर्ण असतं. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चपाती खाल्ल्या जातात. पण मुख्यपणे गव्हाच्या चपात्या अधिक खातात. दिवसभरातील दोन्ही मुख्य जेवणात चपाती भाजी असतेच असते. गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती हे साधं कार्बोहायड्रेट आहे, ज्यामुळे वजन वाढतं. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोजच्या जेवणातील चपात्यांची संख्या कमी करा. डायटिशियन स्वाती सिंग सांगतात की, एका चपातीमध्ये किती कॅलरी असतात आणि रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाणं योग्य आहे जेणेकरून वजन लवकर कमी होईल.
एका चपातीत किती कॅलरी असतात?
डायटिंग करणारे लोक नेहमी कॅलरी काउंट करतात. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात कॅलरी कमी घेणे आवश्यक असते. म्हणूनच चपाती किंवा इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमधील कॅलरी कमी कराव्या. पण बरेच लोक या बाबतीत कन्फ्यूज असतात की एका चपातीमध्ये नेमक्या किती कॅलरी असतात.
खरं तर वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या चपात्यांमध्ये कॅलरीचं प्रमाण वेगळं असतं. सर्वात जास्त कॅलरी गव्हाच्या पिठाच्या चपातीमध्ये आढळतात. एका मध्यम आकाराच्या गव्हाच्या चपातीमध्ये अंदाजे १०४ कॅलरी असतात. जर तुम्ही १०० ग्रॅम गव्हाच्या पिठाच्या चपात्या खात असाल तर सुमारे ३४० कॅलरी मिळतात. जर चपातीवर तुप किंवा तेल लावले तर त्यात सुमारे २५ कॅलरी वाढतात. ज्वारीच्या भाकरीत सर्वात कमी, म्हणजे सुमारे ४० कॅलरी असतात.
रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाव्यात?
दिवसभर नीट न खाल्ल्यामुळे अनेकजण रात्री भरपूर जेवतात. काही लोकांसाठी चपातीशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. पण रात्री जास्त चपाती खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू शकतं.
डायटिशियन स्वाती यांच्या मते जर आपल्याला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर रात्री चपात्या कमी खा. रात्री चपातीऐवजी भाज्या, डाळ, सूप किंवा पनीर यांसारख्या हलक्या आणि प्रथिनयुक्त गोष्टी खा. महिलांनी रात्रीच्या जेवणात २ पेक्षा जास्त चपाती खाऊ नयेत. पुरुषांनी ३ चपात्यापर्यंतच खाणे योग्य आहे.
दिवसभरात चपातीचं प्रमाण थोडं वाढवू शकता, पण रात्री कमी खाणे उत्तम.
रात्री कमी रोटी खाल्ल्याने पचन चांगले होते आणि अन्न लवकर पचते. रोटीची संख्या एकाने कमी केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
रात्री जास्त चपाती खाण्याचे नुकसान
शुगर वाढवू शकते चपाती
रात्री चपाती खाल्ल्याने शरीरात शुगर लेव्हल वाढू शकते. यामुळे डायबिटीस आणि पीसीओडीची समस्या होऊ शकते. जेव्हा चपातीमुळे रक्तात शुगर वाढते तेव्हा इन्सुलिन लेव्हलही प्रभावित होते आणि ही वाढलेली शुगर लेव्हल शरीरातील इतर अवयवांना प्रभावित करते. ज्यामुळे नुकसान होतं.
मेटाबॉलिज्म बिघडतं
चपातीमध्ये सिंपल कार्ब्स असतात जे तुमचं मेटाबॉलिज्म खराब करतात. यामुळे तुमची बॉवेल मुव्हमेंटही बरीच प्रभावित होते. रात्री चपातीऐवजी फायबरचं सेवन करावं. जेणेकरून आरोग्य चांगलं रहावं आणि पचनही वेळीच होतं.
