कितीही पौष्टिक खायचे ठरवले तरी काहीतरी चमचमीत आणि छान खावेसे वाटतेच. अशावेळी मनावर ताबा ठेवणे कठीण जाते. मात्र काही अशा रेसिपी असतात ज्या खाणे पोटासाठी आणि जिभेसाठीही चांगले ठरते. (Diet Food: Eat green bottle guard cutlets, it fills the stomach but does not increase weight and the taste is also delicious)अशीच एक मस्त रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याचे कटलेट. करायला एकदम सोपे आहेत आणि चवीलाही मस्त असतात. पाहा कसे करायचे.
साहित्य दुधी भोपळा, कांदा, हिरवी मिरची, जिरं, हळद, लाल तिखट, काळीमिरी पूड, आलं, लसूण, मैदा, लिंबू, कोथिंबीर, रवा, मीठ, तेल
कृती१. दुधी भोपळा धुवायचा. व्यवस्थित सोलून घ्यायचा. तसेच बारीक किसून घ्यायचा. कांदा सोलायचा. सोलून झाल्यावर कांदा मस्त बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे छान बारीक तुकडे करायचे. कोथिंबीरीची जुडी घ्यायची. स्वच्छ धुवायची. निवडून घ्यायची आणि बारीक चिरायची. तसेच आल्याचा तुकडा घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आलं आणि लसणाची पेस्ट करायची.
२. एका परातीत किसलेला दुधी घ्यायचा आणि त्याचे पाणी काढून टाकायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळे पदार्थ एकत्र करायचे. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची. थोडे लाल तिखट घालायचे. चमचाभर काळीमिरी पूड घालायची. लिंबू पिळायचा. जास्त रस घालू नका. थोडाच घालायचा. अगदी चमचाभर मैदा घाला. मैदा वापरायचा नसेल तर तांदळाचे पीठ घाला.
३. सगळे पदार्थ एकत्र करायचे आणि हाताने छान मळून घ्यायचे. जास्तीचे पाणी काढायचे आणि पीठ जरा घट्ट करायचे. एका ताटलीत थोडा रवा घ्यायचा. त्यात अगदी चमचाभर मीठ घालायचे. पिठाच्या गोलाकार टिक्की तयार करायच्या किंवा कटलेटसाठी जसा आकार तुम्हाला हवा तसा आकार द्या. कटलेट रव्यात घोळवा. सगळीकडे रवा लागेल याची काळजी घ्या.
४. तव्यावर किंवा एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यावर एकएक करुन टिक्की लावा. दोन्ही बाजूनी कुरकुरीत परतून घ्या. मस्त खमंग असे कटलेट परतून झाल्यावर आवडत्या चटणीसोबत खा. गरमागरम खाण्यातच मजा आहे.
Web Summary : Craving something tasty while dieting? Try bottle gourd cutlets! Easy to make with bottle gourd, spices, and a touch of semolina. These cutlets are healthy, filling, and flavorful. Enjoy them hot with your favorite chutney.
Web Summary : डाइटिंग करते समय कुछ स्वादिष्ट खाने का मन है? लौकी के कटलेट आजमाएं! लौकी, मसालों और सूजी के स्पर्श से बनाने में आसान। ये कटलेट स्वस्थ, भरने वाले और स्वादिष्ट होते हैं। अपनी पसंदीदा चटनी के साथ गरमागरम आनंद लें।