भारतात काही भाज्या अशा आहेत ज्या घरोघरी फार आवडीने केल्या जातात. प्रत्येकाची करण्याची पद्धतही वेगळीच. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे आलू - मटार. ही भाजी हॉटेलमध्येही लोकं आवडीने मागवतात. ( Dhaba style Aloo matar - an easy way to make perfect gravy , must try this dish )घरीही केली जाते. मात्र विकतची जास्त छान लागते असे काहींचे मत असते. एकदा या पद्धतीने करुन पाहा. विकतची चवच विसरुन जाल.
साहित्य
बटाटा, मटार, आलं, लसूण, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, कडीपत्ता, कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, धणे पूड, कसुरी मेथी, दूध, साखर, गरम मसाला, कोथिंबीर, सुकी लाल मिरची, तमालपत्र, दालचिनी, मीठ
कृती
१. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यावर बटाटा परतून घ्यायचा. छान खमंग कुरकुरीत परतायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचे तुकडे करायचे. टोमॅटोचे तुकडे करायचे. हिरव्या मिरचीचेही तुकडे करायचे. कांदा सोलून आणि चिरुन घ्यायचा.
२. कढईत थोडे तेल घ्यायचे, त्यावर कांदा परतायचा. आल्याचा तुकडा तसेच लसणाच्या पाकळ्याही परतायच्या. टोमॅटोचे तुकडे घालायचे. कोथिंबीर घालायची. छान परतून घ्यायचे. परतल्यावर बाजूला ठेवा. त्याच कढईत सुकी मिरची, तमालपत्र, दालचिनी घ्यायची, मस्त परतायचे. तयार केलेले कांदा-टोमॅटोचे मिश्रण वाटून घ्यायचे. नंतर सुका मसाला वाटायचा.
३. कढईत तेल घ्यायचे. त्यात जिरे घालायचे. कडीपत्ता आणि मोहरी घालायची, हळद आणि लाल तिखट घालून त्यावर मटारचे दाणे परतायचे. मस्त मऊ होऊपर्यंत परतायचे. छान खमंग परतून घ्यायचे. त्यात बटाट्याचे तुकडेही घालायचे. तयार केलेले वाटणही घालायचे. गरम मसाला घालायचा. तयार केलेले सुके वाटणही घालायचे. धणे पूड घाला आणि मग चवीनुसार मीठ घाला. गरम मसाला घाला, लाल तिखट घाला आणि ढवळून घ्या. कसुरी मेथी घाला. चमचाभर साखर घाला आणि चवीनुसार मीठ घाला.
४. थोडं दूध घाला आणि मिक्स करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आलं लसूण पेस्टही घालायची. सगळं एकजीव करायचं. वाफ काढायची आणि नंतर मसाला जरा घट्ट होऊ द्यायचा. गरमागरम भात किंवा चपाती सोबत खायचे.
