बटाटा हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असतो. बटाट्याची भाजी हा लहान मुलांच्याही आवडीचा पदार्थ आहे. डब्यात बटाटा दिला की मुलं खुष. बटाट्याची भाजी करण्याच्या पद्धती मात्र अनेक आहेत. (Delicious traditional recipe for making Saraswat style potatoes curry, make potato gravy this way)घरोघरी विविध पद्धतीने ही भाजी केली जाते. त्या पैकीच एक मस्त पदार्थ म्हणजे सारस्वत स्टाईल आंबट बटाटा. ही रस्सा भाजी चपातीसोबत तर खाता येतेच मात्र भाताशीही मस्त लागते. एकदा ही रेसिपी नक्की करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे.
साहित्य बटाटा, हिरवी मिरची, ओला नारळ, धणे, कोथिंबीर, पाणी, हिंग, हळद, मीठ, लाल तिखट, काळी मिरी, साखर, मेथी दाणे, चिंच
कृती१. बटाटे धुवायचे आणि सोलून घ्यायचे. नंतर बटाट्याचे लांब लांब काप करायचे. काप थोडावेळ मीठ पाण्यात ठेवायचे. पाण्यात एका वाटीत पाणी घ्यायचे त्यात चिंच भिजत ठेवायची. पाणी गरम घ्यायचे म्हणजे चिंच लवकर मऊ होते. चिंच मऊ झाल्यावर हाताने कुस्करायची. गाळून घ्या आणि चोथा काढून टाका.
२. कढईत चमचाभर तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात चार मेथीचे दाणे घालायचे. थोडे हिंग घाला नंतर बटाटा घालायचा. मस्त परतून घ्यायचा. त्यावर झाकण ठेवायचे आणि बटाटा शिजू द्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात ताजे छान ओले खोबरे घ्यायचे. त्यात चमचाभर धणे घालायचे आणि एक अख्खी हिरवी मिरची घाला. तिखट आवडत असेल तर जास्त मिरची घ्या. चार काळीमिरीचे दाणे घाला. मस्त वाटून घ्या. वाटण्यासाठी अगदी थोडे पाणी वापरा.
३. बटाटे शिजत आल्यावर त्यात चिंचेचा कोळ घालायचा. चिंचेचे पाणी घालून झाल्यावर त्यात लाल तिखट घाला. तसेच तयार केलेले वाटणही त्यात घाला आणि छान ढवळून घ्या. चमचाभर साखर घाला आणि झाकण ठेवा. छान वाफ काढून घ्या. भाजी एकजीव होऊ द्या. चवीनुसार मीठ घाला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि जरा पाणी आटू द्या. मस्त रस्सा भाजी तयार होते.
Web Summary : Make this easy Saraswat-style tangy potato curry with coconut, spices, and tamarind. It pairs well with both roti and rice. A simple, flavorful dish!
Web Summary : नारियल, मसालों और इमली के साथ यह आसान सारस्वत शैली का खट्टा आलू करी बनाएं। यह रोटी और चावल दोनों के साथ अच्छी तरह से मेल खाता है। एक सरल, स्वादिष्ट व्यंजन!