ना जास्त सामग्री आणि ना जास्त वेळ पटकन करता येईल असा नाश्ता म्हणजे पोळं. बेसनाचं धिरडं तर नेहमी आपण खातोच. एकदा हे ओट्सचे ही खाऊन पाहा. (Delicious oatmeal pancakes, a nutritious breakfast, 5 minutes easy recipe)अगदी सोपी रेसिपी आहे. पाच मिनिटांत होते. ओट्स चवीला आवडत नसतील या पदार्थानंतर नक्कीच आवडायला लागतील. हलका नाश्ता करायचा असेल तर ही रेसिपी अगदी उत्तम ठरते.
साहित्य
ओट्स, बेसन, पाणी, दही, मीठ, हळद, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, लाल तिखट, तेल
कृती
१. एका खोलगट पातेल्यात ओट्स घ्यायचे. त्यात दही घालायचे. थोडे पाणी घालायचे. दोन चमचे बेसन घालायचे मिक्स करायचे आणि सेट व्हायला ठेवायचे. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. टोमॅटो बारीक चिरायचा. सिमला मिरची बारीक चिरायची. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे.
२. मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे भिजवायचे. नंतर मिक्स करायचे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. सिमला मिरची घालायची आणि टोमॅटोही घालायचा. चमचाभर लाल तिखट घालायचे. चमचाभर हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. सगळे पदार्थ एकत्र करायचे. व्यवस्थित मिक्स करायचे.
३. तव्याला तेल लावायचे. तवा छान गरम करायचा. मग त्यावर तयार मिश्रणाचा डोसा लावायचा. पातळ थर लावा. एका बाजूनी मस्त खमंग परतून झाल्यावर पलटायचा आणि दुसर्या बाजूनेही छान परतायचा. मस्त कुरकुरीत होतो. मग गरमागरम खायचा. चटणी किंवा सॉससोबत खा.
