Join us

हिरवेगार आप्पे-मस्त चटणी असा बेत करुन तर पाहा, मूग-पालकाचा स्वादिच्छ पदार्थ-पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 15:46 IST

delicious green Appe, try this delicious moong-spinach dish - see the recipe : आता असे अप्पे खाऊन बघा. चविष्ट आणि पौष्टीक.

साधे पांढरे अप्पे तुम्ही तयार करतच असाल. मध्यंतरी बीटाचे गुलाबी- लालसर असे अप्पे ट्रेंडमध्ये होते. पण तुम्ही कधी हिरवे अप्पे खाल्ले आहेत का? दिसायला तर फारच मस्त असतात. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. प्रचंड पौष्टिकही आहेत. ( delicious green Appe, try this delicious moong-spinach dish - see the recipe)डेली फुडिजच्या इंस्टाग्राम पेजने अशी मस्त हटके रेसीपी शेअर केली आहे. जर पौष्टिक, चविष्ट आणि रंगीत एकाच पदार्थात मिळत असेल तर, तो ट्राय केलाच पाहिजे.  ( delicious green Appe, try this delicious moong-spinach dish - see the recipe)

लहान मुलं कडधान्ये खाण्यासाठी फार नाटकं करतात. पण कडधान्ये शरीरासाठी प्रचंड महत्त्वाची असतात. कडधान्यांमध्ये पोषकसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांनीच काय तर, सगळ्यांनीच कडधान्ये खायला हवी. जर कडधान्यांची भाजी खायला मुलं नाही म्हणत असतील तर, अशी प्रकारे त्यांना ती खायला घालता येतात. पोटात सत्वेही जातात आणि मुलांना कळतही नाही.  

साहित्यमोड आलेले मूग, बेसन, पालक, पाणी, आलं, लाल तिखट, जीरे पावडर, मीठ, तूप, बेकींग पावडर

कृती१. एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग, बेसन, आलं घ्या. त्यात कच्चा पालक चिरून घाला. त्यात थोडं पाणी घाला. ते मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. २. व्यवस्थित वाटा जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. अप्पे लावता येतील एवढंच पातळ करा. अप्प्यांसाठी अति पातळ मिश्रण काही कामाचे नाही. 

३. एका भांड्यात ते मिश्रण काढून घ्या. त्यामध्ये लाल तिखट, जीरे पावडर, मीठ, बेकींग पावडर घाला. आणि सगळं मस्त मिक्स करून घ्या. ४. गॅसवर अप्पे पात्र ठेवा. थोडं गरम करून घ्या. त्याला तूप लावून घ्या. तूप नको असेल तर तेलही वापरू शकता. ५. नंतर तयार मिश्रणाचे मस्त अप्पे लावा. १५ ते २० मिनिटात अप्पे तयार होतील. 

भाजी पालकाचीच वापरायला हवी असे काही नाही. तुमच्या आवडीची भाजी वापरा. तसेच इतरही कडधान्यांच्या अशा रेसिपी तयार करता येतात. त्याचे डोसे, धीरडीही तयार करता येऊ शकतात. मोड आलेली कडधान्ये शरीरासाठी फार उपयुक्त ठरतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीआरोग्यआहार योजना