Datta Jayanti 2025 Prasad: गुरूवारचा नैवेद्य म्हटलं की काय गोड पदार्थ करायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. आज दत्त जयंती (Datt Jayanti 2025) तसंच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा दुसरा गुरूवारसुद्धा आहे. या निमित्तानं तुम्ही नैवेद्य म्हणून मुगाच्या डाळीचा शिरा करू शकता. हा शिरा करायला एकदम सोपा असतो. मुगाच्या डाळीच्या शिऱ्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. (Datt Jayanti Naivedya Special Sheera Recipe)
मुगाच्या डाळीचा शिरा करण्याची सोपी रेसिपी
मूग डाळ स्वच्छ धुऊन ४ ते ६ तास किंवा रात्रभर पुरेशा पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेली डाळ पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर (रव्यासारखी) वाटून घ्या. डाळ वाटताना पाण्याचा वापर एकदम कमी किंवा अजिबात करू नका. शिरा दाणेदार होण्यासाठी डाळ जाडसर वाटणे महत्त्वाचे आहे.
एका जाड बुडाच्या कढईत अर्धी वाटी तूप गरम करा. गरम तुपात वाटलेली डाळ घाला आणि गॅस मंद आचेवर ठेवा. डाळ सतत ढवळत रहा. ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. डाळ चिकटणार नाही याची काळजी घ्या. साधारण २० ते ३० मिनिटे डाळ मंद आचेवर भाजा. सुरुवातीला मिश्रण चिकट होईल. हळूहळू, जसजशी डाळ भाजली जाईल, तसतसे ती तुपात मोकळी होऊन दाणेदार होईल आणि रंग हलका सोनेरी होईल.
डाळ पूर्णपणे भाजल्यावर ती तूप सोडायला लागते आणि तिचा रंग सोनेरी-तपकिरी होतो. यावेळी डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे हे समजावे. भाजलेल्या डाळीमध्ये गरम केलेले दूध आणि पाणी घाला. लगेच झाकण ठेवा, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि मिश्रण शिजू लागेल.
दोन मिनिटांनी झाकण काढून उरलेले तूप, साखर, वेलची पूड आणि केशर घाला. साखर विरघळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले ढवळा. शिरा कढई सोडायला लागला की, तो तयार झाला असे समजावे.तयार मुगाच्या डाळीचा शिरा एका भांड्यात काढा आणि वरून सुका मेव्याच्या कापांनी सजवा. तयार आहे नैवेद्याचा शीरा.
Web Summary : Confused about Thursday's Naivedya? Prepare easy Moong Dal Sheera for Datt Jayanti. Soak, grind moong dal, roast in ghee, add milk, sugar, cardamom, and garnish with dry fruits. Quick, delicious offering ready!
Web Summary : गुरुवार के नैवेद्य के लिए क्या बनाएं? दत्त जयंती पर मूंग दाल का शीरा बनाएं। दाल भिगोकर पीस लें, घी में भूनें, दूध, चीनी, इलायची डालें और सूखे मेवों से सजाएं। झटपट नैवेद्य तैयार!