Lokmat Sakhi >Food > खजूर खाण्याचे ५ फायदे, हिवाळ्यात खजूर खायलाच हवा, पाहा किती आणि कधी खायचा?

खजूर खाण्याचे ५ फायदे, हिवाळ्यात खजूर खायलाच हवा, पाहा किती आणि कधी खायचा?

आरोग्याबाबत थोडा निष्काळजीपणाही हिवाळ्यात महागात पडू शकतो. या ऋतूत स्वतःला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी आपल्या आहारात खजूरचा समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:50 IST2024-12-23T13:50:14+5:302024-12-23T13:50:47+5:30

आरोग्याबाबत थोडा निष्काळजीपणाही हिवाळ्यात महागात पडू शकतो. या ऋतूत स्वतःला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी आपल्या आहारात खजूरचा समावेश करा

dates in your diet to keep yourself healthy and fit in this season | खजूर खाण्याचे ५ फायदे, हिवाळ्यात खजूर खायलाच हवा, पाहा किती आणि कधी खायचा?

खजूर खाण्याचे ५ फायदे, हिवाळ्यात खजूर खायलाच हवा, पाहा किती आणि कधी खायचा?

आरोग्याबाबत थोडा निष्काळजीपणाही हिवाळ्यात महागात पडू शकतो. या ऋतूत स्वतःला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी आपल्या आहारात खजूरचा समावेश करा. हिवाळ्यात खजूर खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढतं आणि हृदय आणि मेंदूलाही बळ मिळतं. आरोग्याला कोणते फायदे होतात आणि एका दिवसात किती खावेत हे जाणून घेऊया...

खजूर खाणं असं ठरतं फायदेशीर 

खजूर खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते कारण त्यात विरघळणारे फायबर मुबलक प्रमाणात असताच आणि अमीनो ॲसिडही आढळतं.

खजूरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे ते शरीराच्या मज्जासंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवून खजूर तुमच्या हृदयाच्या आरोग्याचं रक्षण करतं.

खजूरमध्ये शरीराला ऊर्जा देण्याची अद्भुत क्षमता असते. त्यात ग्लुकोज आणि सुक्रोज सारख्या नैसर्गिक शर्करा मुबलक प्रमाणात असतात. दुधासोबत खजूर घेतल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

 गर्भवती महिलांसाठी खजूर फायदेशीर ठरतं. खजूर गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून आराम देतं.

जर तुम्हाला वजन वाढण्याची चिंता वाटत असेल तर खजूर खा, कारण त्यात असलेले घटक वजन कमी करण्यास मदत करतात. 

कधी आणि किती खावेत खजूर?

खजूर खाणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवून सकाळी उपाशीपोटी खा. उपाशीपोटी खजूर खाल्ल्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही उत्साहीत राहू शकता. एनर्जी टिकून राहील. तुम्ही एका दिवसात ३ ते ४ खजूर खाऊ शकता. जास्त प्रमाणात खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं.
 

Web Title: dates in your diet to keep yourself healthy and fit in this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.