Lokmat Sakhi >Food > चॉकलेटचा एक तुकडा खाताच क्षणात होईल बदल, जादू झाल्यासारखा मूडही होतो छान कारण..

चॉकलेटचा एक तुकडा खाताच क्षणात होईल बदल, जादू झाल्यासारखा मूडही होतो छान कारण..

Dark Chocolate Benefits : कोको जास्त प्रमाणात असलेलं डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्यानं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि खनिज मिळू शकतात. सोबतच यानं हृदयरोगांपासूनही बचाव होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:57 IST2025-07-04T13:51:13+5:302025-07-04T19:57:58+5:30

Dark Chocolate Benefits : कोको जास्त प्रमाणात असलेलं डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्यानं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि खनिज मिळू शकतात. सोबतच यानं हृदयरोगांपासूनही बचाव होऊ शकतो.

Dark chocolate can solve many health problems, know its benefits | चॉकलेटचा एक तुकडा खाताच क्षणात होईल बदल, जादू झाल्यासारखा मूडही होतो छान कारण..

चॉकलेटचा एक तुकडा खाताच क्षणात होईल बदल, जादू झाल्यासारखा मूडही होतो छान कारण..

Dark Chocolate Benefits : चॉकलेट खाणं जवळपास सगळ्यांनाच आवडतं. आपणही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आवडीनं खात असाल. चॉकलेटची टेस्ट तर मनाला मोहिनी घालणारी असतेच, सोबतच यात आरोग्यासाठी फायदेशीर अनेक गुणही असतात. चॉकलेटमध्ये कोको नावाचं तत्व असतं, ज्यात अनेक व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. कोको जास्त प्रमाणात असलेलं डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्यानं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि खनिज मिळू शकतात. सोबतच यानं हृदयरोगांपासूनही बचाव होऊ शकतो. पण जर जास्त प्रमाणात खाल तर शुगर आणि कॅलरी इनटेक वाढेल.

डार्क चॉकलेटमधील पोषक तत्व

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, डार्क चॉकलेट तुमचं आरोग्य सुधारण्यास आणि हृदयरोगांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतं. यात ५.५ ग्रॅम फायबर, ३३ टक्के आयर्न, २८ टक्के मॅग्नेशिअम, ९८ टक्के कॉपर आणि ४३ टक्के मॅगनिज असतं. 

अॅंटी-ऑक्सिडेंट्सचा खजिना

डार्क चॉकलेटमध्ये कार्बनिक तत्व असतात, जे जैविक रूपानं खूप सक्रिय असतात. हे शरीरात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सच्या रूपात काम करतात. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल, एपिकॅटेचिन, कॅटेचिन आणि ऑलिगोमेरिक प्रोसायनिडिनसारखे तत्व आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. फ्री रॅडिकल्स हे फार घातक असतात, हे ऑक्सिडेटिव स्ट्रेसचं कारण बनू शकतात. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

रक्तप्रवाह सुधारतो

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवॉनॉइड्स असतात, जे एंडोथेलिअमला म्हणजे धमण्यांच्या वरच्या थराला नायट्रिक ऑक्साइडचं उत्पादन करण्यासाठी उत्तेजित करतात. यानं धमण्या खुलतात आणि ब्लड सर्कुलेशन सुरळीतपणे होतं.

ब्लड प्रेशर कंट्रोल

आपल्या शरीरात नायट्रोजन ऑक्साइड धमण्यांना खुलण्यासाठी संकेत पाठवतं, ज्यामुळे ब्लड फ्लो सुरळीत होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं. कोकोमधील फ्लेवेनॉल्स नायट्रिक ऑक्साइडच्या उत्पादनात मदत करतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि ब्लड प्रेशर कमी कऱण्यास मदत मिळते.

Web Title: Dark chocolate can solve many health problems, know its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.