Pulses Foam : भारतीय आहारात डाळींना खूप जास्त महत्व असतं. वेगवेगळ्या डाळींची वेगवेगळी टेस्ट तर असतेच, सोबतच या डाळींमधून शरीराला भरपूर पोषणही मिळतं. पण आपण पाहिलं असेल की, डाळी शिजवताना त्यातून पांढरा किंवा हलक्या पिवळ्या रंगाचा फेस येतो.
काही लोकांच्या मनात या फेसाबाबत संशय निर्माण होतो, पण जास्तीत जास्त लोक या फेसाकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. फेस तसाच राहू देतात. आपल्याला फेसाबाबत संशय येत असेल तर, हा फेस काय असतो आणि नुकसानकारक असतो का? हेच आज आपण पाहणार आहोत. न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी याबाबत इन्स्टावर व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे.
डाळ शिजवताना फेस का येतो?
जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा त्यातील स्टार्च, प्रोटीन आणि सॅपोनिन्स पाण्यात मिक्स होतात, त्यामुळे फेस तयार होतो. एक्सपर्टनुसार, हा फेस काही नुकसानकारक तत्व नाही.
सॅपोनिन्स म्हणजे काय?
सॅपोनिन्स झाडांमध्ये आढळणारं एक नॅचरल एंझाइम आहे. हे तत्व झाडं कीटकांपासून आपल्या बचावासाठी तयार करतात. त्यामुळे डाळींमध्ये सॅपोनिन्स असणं एक सामान्य बाब आहे. अशात हे तत्व आपल्या शरीरासाठी नुकसानकारक नाहीतर अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं.
अनेकदा लोक या फेसाला यूरिक अॅसिड किंवा एखादं टॉक्सिन मानतात. पण हा एक गैरसमज आहे. हा फेस विषारी नसतो आणि कोणत्या आजाराचं कारणही ठरत नाही. वैज्ञानिक काही संशोधनातून सांगितलं आहे की, डाळींमधील सॅपोनिन, स्टार्च आणि प्रोटीनचं थोडं प्रमाण शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं.
काय मिळतात फायदे?
यानं पचन तंत्र मजबूत होतं.
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहू शकतं
गट हेल्थ आणि इम्यूनिटीवर सकारात्मक प्रभाव
त्यामुळे पुढच्या वेळी जर डाळ शिजवताना फेस दिसत असेल तर घाबरण्याची गरज नाही.
डाळीतील फेस कसा कमी कराल?
डाळीमधून येणारा हा फेस नुकसानकारक असतो, पण तरी तो जर आपल्याला पसंत नसेल तर, काही टिप्स वापरून हा फेस कमी करता येऊ शकतो.
डाळ पाण्यात भिजवून ठेवा
डाळ शिजायला ठेवण्याआधी दोन पाण्यानं चांगली धुवून घ्या आणि नंतर किमान अर्धा तास भिजवून ठेवा. असं केल्यानं डाळ शिजवताना फेस येण्याची शक्यता कमी असते.
तूप घाला - डाळ शिजवताना त्यात एक छोटा चमचा तूप घालू शकता. असं केल्यासही फेस जास्त येणार नाही. तसेच डाळीची टेस्टही वाढेल आणि पोषणही वाढेल.
गॅसची पॉवर कमी ठेवा- डाळ जर जास्त आचेवर शिजवली तर त्यात लवकर आणि जास्त फेस तयार होतो. कमी आचेवर डाळ शिजवाल तर फेस कमी येईल. सोबतच डाळ चांगली शिजेलही.
कशा खाल बिया?
- पपईच्या बिया तुम्ही थेट अशाही खाऊ शकता. या बियांची टेस्ट थोडी चटपटीत लागते. आधी थोड्याच बिया खा नंतर प्रमाण वाढवा.
- पपईच्या बिया तुम्ही स्मूदीमध्ये टाकूनही खाऊ शकता. यानं शरीराला अधिक पोषण मिळेल.
- सलाद आणखी टेस्टी आणि वेगळा बनवण्यासाठी तुम्ही यात पपईच्या बिया टाकू शकता. यासाठी पपईच्या बिया बारीक करून सलादमध्ये टाका.