Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हे’ त्रास असतील तर उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नये दही, तब्येत बिघडायची आणि उन्हाळा व्हायचा अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:51 IST

Curd Side Effects In Summer : काही लोकांनी दही खाताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. जर काळजी घेतली नाही तर फायदे होण्याऐवजी दह्याने काही आरोग्य समस्या वाढू शकतात.

Curd Side Effects In Summer : उन्हाळ्यात दही खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोक दही खातात. दही पोट थंड ठेवण्यास मदत करतं आणि शरीराला अनेक पोषक तत्त्वे देतं. दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, व्हिटामिन A, B आणि C सारखी महत्त्वाची तत्त्वं असतात. मात्र, प्रत्येकासाठी दही फायदेशीर असेलच असं नाही. काही लोकांनी दही खाताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. जर काळजी घेतली नाही तर फायदे होण्याऐवजी दह्याने काही आरोग्य समस्या वाढू शकतात.

उन्हाळ्यात 'या' लोकांनी दही खाणं टाळावं

1) पोट फुगण्याची समस्या असलेले लोक

दह्यात प्रोबायोटिक्स असतात जे पचनासाठी चांगले असतात. पण काही लोकांमध्ये यामुळे गॅस आणि ब्लोटिंग वाढू शकते. म्हणजेच पोट फुगण्याची समस्या वाढू शकते.

2) पचन कमजोर असलेले लोक

ज्यांचे पचन तंत्र कमजोर आहे त्यांनी रोज दही खाणं टाळावं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. दही पचनासाठी फायदेशीर असतं, पण ज्यांना पचनासंबंधी समस्या आहेत, त्यांनी दही खाताना काळजी घ्यावी.

3) यूरिक अॅसिड असलेले लोक

दह्यात भरपूर प्रोटीन असतं. यूरिक अॅसिड जास्त असलेल्या लोकांनी प्रोटीनचं जास्त सेवन टाळावं, अन्यथा सांध्यांमध्ये वेदना आणि सूज वाढू शकते.

4) अस्थमा रुग्ण

दही थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे अस्थमा असलेल्या लोकांना सर्दी-खोकला वाढण्याची शक्यता असते. 

5) आर्थरायटिस असलेले लोक

दह्यातील काही घटकांमुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूज वाढू शकते, त्यामुळे आर्थरायटिस असलेल्या लोकांनी दही कमी खावे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these mistakes while eating curd in summer for good health.

Web Summary : Curd offers benefits in summer, but certain individuals should avoid it. Those with bloating, weak digestion, high uric acid, asthma, or arthritis may experience worsened conditions. Consume with caution.
टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशल