Join us

दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:34 IST

अनेकदा लोक गोंधळलेले असतात की, दही आणि ताक यांच्यापैकी आरोग्यासाठी सर्वात अधिक फायदेशीर काय आहे? चला जाणून घेऊया दोघांचेही फायदे आणि तोटे.

ऋतू कोणताही असो दही आणि ताक याला नेहमीच एक विशेष महत्त्व आहे. दोघांची चव आणि त्यांचे फायदे वेगवेगळे असतात. दोन्हीही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र अनेकदा लोक गोंधळलेले असतात की, दही आणि ताक यांच्यापैकी आरोग्यासाठी सर्वात अधिक फायदेशीर काय आहे? चला जाणून घेऊया दोघांचेही फायदे आणि तोटे.

डॉ. रूपाली जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दही आणि ताक दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, मात्र ते निवडताना आपल्या गरजा आणि ऋतू लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दही हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक उत्कृष्ट सोर्स आहे, जे हाडे मजबूत करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. दुसरीकडे ताक पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा देतं. उन्हाळ्यात ताक आणि हिवाळ्यात दही सेवन करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.

दही

दह्यामध्ये असलेलं कॅल्शियम, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स शरीर बळकट करण्यास मदत करतात.

दही हाडं आणि दात मजबूत करतं.

पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवून ते पचन सुधारतं.

दररोज दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर दही उपयुक्त ठरू शकतं कारण त्यात पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात.

ताक

ताक पचनासाठी चांगलं असतं आणि उन्हाळ्यात शरीर थंड करतं.

ताकात असलेले लॅक्टिक एसिड पचन सुधारतं आणि गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम देतं.

शरीरातील डिहायड्रेशन रोखतं आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखतं.

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ताक हा एक उत्तम पर्याय आहे कारण ते हलकं असतं.

दही की ताक...

जर तुम्हाला मजबूत हाडं आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी असेल तर दही हा एक चांगला पर्याय आहे.

जर तुम्हाला हलकं, पचण्यास सोपं आणि थंडगार पेय हवं असेल तर ताक निवडा.

जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असेल तर ताक जास्त उपयुक्त आहे.

जर तुम्हाला शरीराला ऊर्जा द्यायची असेल तर दही उपयुक्त आहे.

दोन्हीही शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात, म्हणून आहार आणि ऋतूनुसार त्यांची निवड करणं योग्य ठरतं.

 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य