संध्याकाळी चहासोबत खायला सृकाहीतरी हवे. मात्र नेहमी काय करायचे असा प्रश्न पडतो. एकदा ही रेसिपी नक्की करुन पाहा. करायला एकदम सोपी आहे तसेच चवीला मस्तच. लहान मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. (Crispy potato bites! A crunchy snack to eat with tea - easy recipe)तसेच मोठेही बोटं चाटून खातील. शिवाय अगदी मोजक्या साहित्यात करता येते. पाहा ब्रेड बटाटा बाईट्स करायची सोपी रेसिपी.
साहित्य
ब्रेड, बटाटा, तांदूळ पीठ, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, लाल तिखट, पाणी
कृती
१. बटाटे उकडायचे. उकडून झआल्यावर गार करायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. बटाटे कुस्करुन घ्यायचे. छान मऊ कुस्करा त्यात अजिबात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. एका ताटलीत थोडे पाणी घ्यायचे. त्यात चार ब्रेडचे स्लाइस घ्या. ब्रेड मस्त मऊ करायचा. पाणी काढून टाकायचे. ब्रेड हाताने आधी लगदा करायचा आणि मग जरा मोकळा करायचा. त्यात उकडलेला बटाटा घाला. दोन्ही पदार्थ छान एकजीव करायचे.
२. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि नंतर बारीक चिरायची. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे तयार पिठात घला. त्यात थोडे तांदूळाचे पीठ घालायचे. तसेच त्यात थोड लाल तिखट घालायचे. चवी पुरते मीठ घालायचे. सारे मिश्रण छान एकजीव करायचे. मऊसर पीठ मळायचे.
३. त्याचे त्रिकोण तयार करायचे. त्यासाठी पीठाचे गोळे करुन घ्या. जाडच गोळे ठेवायचे आणि नंतर सुरीच्या मदतीने त्रिकोण पाडायचे. तुम्हाला दुसरा आकार हवा असेल तर दुसरा आकार द्या. त्रिकोण जास्त कुरकुरीत होतो.
४. एका कढईत तेल गरम करायचे. गरम तेलात हळूहळू तयार केलेले त्रिकोण तळायचे. मस्त खमंग परतून घ्यायचे. आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत असे तळायचे. रंगाला छान लालसर होतात. सॉस किंवा चटणीसोबत खा.