बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स म्हणून काय वेगळं करावं... किंवा मुलांना डब्यात कोणता पदार्थ करून द्यावा.. कारण मुलांना रोज डब्यात पोळी- भाजी नको असते. त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. अशावेळी चवीमध्ये बदल होईल असा सोपा पदार्थ आपल्याला हवा असतो (Crispy Poha Pakoda Recipe). असाच एक पदार्थ आहे पोह्यांचे कुरकुरीत आणि अतिशय खमंग होणारे वडे (how to make pakoda from poha?). वडे करण्याची रेसिपी अगदी सोपी असून त्यासाठी तुम्हाला खूप काही पुर्वतयारी करण्याची गरज नाही.(instant poha pakoda for breakfast and kids tiffin)
पोह्याचे खमंग वडे करण्याची रेसिपी
साहित्य
१ कप पोहे आणि १ कप रवा
१ कप दही आणि १ उकडलेला बटाटा
२ ते ३ हिरव्या मिरच्या आणि ७ ते ८ लसूण पाकळ्या
महिलांसाठी सुपरफूड: आजी असो की नात.. प्रत्येकीने खायलाच हवे ५ पदार्थ- थकवा, अशक्तपणा येणारच नाही
२ टेबलस्पून कोथिंबीर आणि १ इंच आल्याचा तुकडा
चवीनुसार मीठ आणि थोडी धने, जिरे पूड
चिमूटभर बेकिंग सोडा आणि वडे तळण्यासाठी तेल
कृती
सगळ्यात आधी तर पोहे मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये रवा, दही तसेच मिरचीचे तुकडे, आल्याचे काप आणि लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून एकजीव पीठ तयार करून घ्या.
पिंपल्सच्या काळ्या डागांमुळे चेहरा खराब दिसतो? तुळशीच्या पानांचा सोपा उपाय- चेहरा होईल स्वच्छ, नितळ
हे पीठ एका भांड्यात काढा. त्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेल्या बटाट्याचा किस आणि मीठ घाला. सगळं पदार्थ हलवून घ्या आणि हे पीठ १० मिनिटे झाकून ठेवा.
त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घाला आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे वडे तळून घ्या. खमंग वडे टोमॅटो केचअपसोबत किंवा चिंच- पुदिना चटणीसोबत खूप चटपटीत लागतात.
