टोमॅटो शेव हा दिवाळीच्या फराळात एक वेगळा आणि चविष्ट पदार्थ आहे. मस्त तिखट आणि कुरकुरीत अशी ही शेव मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. चहाबरोबर किंवा स्नॅक म्हणूनही टोमॅटो शेव उत्तम लागते. (Crispy and spicy tomato sev is very easy to make at home! Tastes better than store-bought, make it at home in no time)दिसायलाहीमस्त लाल असते आणि खायला खुसखुशीत असल्यामुळे ती फराळात नक्की असायला हवी. बाजारात मिळणाऱ्या शेवपेक्षा घरची टोमॅटो शेव अधिक ताजी आणि खास चवीची असते. यंदाच्या दिवाळीत ही स्वादिष्ट टोमॅटो शेव नक्कीच करुन पाहा.
साहित्य
टोमॅटो, बेसन, हिरवी मिरची, लसूण, मीठ, लाल तिखट, पाणी, तेल
कृती
१. छान ताजे पिकलेले टोमॅटो घ्या. त्याचे लहान तुकडे करा. हिरवी मिरची घ्या आणि तिचेही तुकडे करा. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे घ्यायचे. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्याची मस्त पेस्ट तयार करायची.
२. एका खोलगट पातेल्यावर मोठी गाळणी ठेवायची. त्यावर तयार केलेली प्युरी ओतायची. चमच्याने प्युरी छान ढवळायची म्हणजे व्यवस्थित गाळली जाते. गाळून झाल्यावर चोथा टाकून द्यायचा. त्यात थोडे पाणी घालून रस छान काढून घ्यायचा.
३. एका परातीत बेसन घ्यायचे. त्यात दोन चमचे लाल तिखट घालायचे. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. थोडे तेल गरम करायचे. गरम तेल बेसनात ओतायचे. त्यात तयार केलेली टोमॅटो प्युरी ओतायची. हाताने पीठ मळायचे. त्यात थोडे पाणी घालायचे गरज असेल तरच घाला. घट्ट पीठ मळायचे. जरा वेळ झाकून ठेवायचे.
४. शेवयंत्र घ्यायचे. तयार पिठाचे गोळे तयार करायचे आणि यंत्रात भरायचे. कढईत तेल गरम करायचे. मध्यम गरम झाल्यावर त्यात शेव सोडायची आणि खमंग तळून घ्यायची. काढून घ्यायची आणि तिचे तुकडे करायचे. हवाबंद डब्यात साठवायची. चवीला मस्त लागते आणि जास्त दिवस टिकते.