Join us

रोज रात्री गोड, चटपटीत खाण्याची इच्छा होते? तुमच्या शरीरात 'या' गोष्टींची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:59 IST

जर तुम्हाला रात्री वारंवार गोड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर वेळीच सावध व्हा.

कधीकधी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी खाण्याची इच्छा होते. जर कधीतरीच असं घडलं तर हे सामान्य आहे. पण जर तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी गोड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर ते तुमच्या शरीरात काही आवश्यक पोषकतत्वांची कमतरता आहे. अनेकदा आपण अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर गंभीर बनू शकतात. म्हणून जर तुम्हाला रात्री वारंवार गोड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर वेळीच सावध व्हा.

रोज रात्री गोड खाण्याची इच्छा का होते?

जर तुम्हाला दररोज रात्री गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर शरीरात क्रोमियम, मॅग्नेशियम किंवा बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्सची कमतरता आहे. मॅग्नेशियम रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतं आणि त्याची कमतरता इन्सुलिन लेव्हल बिघडू शकतं, ज्यामुळे पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. याशिवाय, जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही किंवा तुम्ही तणावग्रस्त असाल तर शरीर जास्त कॉर्टिसोल हार्मोन सोडतं ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा निर्माण होते.

रात्री चटपटीत पदार्थ हवेत? 

जर तुम्हाला रात्री चिप्स, स्नॅक्ससारखे चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होऊ लागली तर ते शरीरात सोडियम, पोटॅशियम किंवा क्लोराईड सारख्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असू शकते. जास्त घाम आल्यावर, जास्त व्यायाम केल्यानंतर किंवा डिहायड्रेशनमुळे चटपटीत खाण्याची इच्छा होते. याशिवाय कधीकधी तणावामुळे हे होऊ शकतं.

जर तुम्हाला दररोज रात्री एकाच वेळी खाण्याची इच्छा होत असेल तर ती तुमची सवय असू शकते. परंतु जर खाण्याची इच्छा खूप जास्त असेल तर ते पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे असू शकते. यासोबतच, जर तुम्ही दिवसभर तुमच्या आहाराकडे लक्ष देत असाल, तरीही तुम्हाला अशी इच्छा होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न