मिल्क केक हा गोड पदार्थांमधला एक अगदी खास प्रकार आहे. कारण तो करायला जरी सोपा असला तरी त्याची चव खूपच खास आणि समाधान देणारी असते. दूध, साखर आणि थोड्याशा घट्टपणामुळे तयार होणारा हा केक पारंपरिक भारतीय मिठाईसारखाच लागतो. दुधाचा केक फार चविष्ट आणि मऊ असतो. मिल्क केकची चव फार तीव्र किंवा अतिगोड नसते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडतो. (Cottony soft and absolutely spongy milk cake, recipe ready in 30 minutes - perfect proportions - great taste)दुधाची नैसर्गिक गोडी आणि हलकीशी कॅरामेलाइज चव फारच मस्त लागते. म्हणूनच सण, समारंभ किंवा खास प्रसंगी मिल्क केक हमखास मागवला जातो.
हा केक दिसायलाही साधा पण आकर्षक असतो. पांढरा आणि हलका तपकिरी रंग, घट्ट पण मऊसर रचना यामुळे तो कापतानाही तुटत नाही. शिवाय फार महागडे किंवा शोधून आणावे लागेल असे जिन्नस वापरावे लागत नाही. साधे घरात असलेले रोजच्या वापराचे पदार्थ वापरायचे. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
साय , दूध, पिठीसाखर, मिल्क पावडर, मैदा, बेकिंग सोडा, वेलची पूड, तूप
कृती
१. एका खोलगट पातेल्यात साय घ्यायची. वाटीभर ताजी साय घ्या. साय मस्त फेटून घ्यायची. नंतर त्यात मैदा घालायचा आणि ढवळून घ्यायचे. तसेच पिठीसाखरही घालायची. मैदा अर्धी वाटीच घाला. पिठीसाखरही अर्धी वाटी घाला. मिल्क पावडर वाटीभर घालायची. मिक्स करायचे आणि सगळे पदार्थ एकजीव होईपर्यंत फेटत राहायचे. त्यात भरपूर तूप घालायचे.
२. मिश्रण छान सेट झाले की त्यात थोडा बेकींग सोडा घालायचा. चमचाभर वेलची पूड घालायची. मिश्रण एका पसरट आणि लांबट डब्यात किंवा भांड्यात ओाताचे. मात्र आधी त्या भांड्याला बटर पेपर लावायचा. म्हणजे केक चिकटत नाही. डबा जरा ठोकायचा आणि केक सेट करायचा. कुकरमध्ये ठेवायचा आणि वाफवून घ्यायचा. २५ चे ३५ मिनिटांत छान मऊ असा मिल्क केक होतो.
