त्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भन्नाट आणि जरा वेगळी अशी रेसिपी एकदा नक्की करुन पाहा. करायला फार सोपी आहे मात्र एकदम चमचमीत आहे. विकतच्या भाज्याही फिक्या पडतील एवढी छान लागेल. (Corn - Capsicum Spicy curry- If you want to eat something different, this recipe is especially for you, must try )घरात असलेले मसाले वापरा आणि मस्त अशी मका- सिमला मिरची मसाला तयार करा. लहान मुलांना नक्कीच आवडेल. तसेच डब्यासाठीही मस्त रेसिपी आहे. पाहा कशी करायची.
साहित्य
मक्याचे दाणे, सिमला मिरची, काजू, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, तेल, जिरं, हिंग, लाल तिखट, कसूरी मेथी, मीठ, साय, पाणी
कृती
१. एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवा त्यात मक्याचे दाणे उकळून घ्यायचे. कांदा सोला आणि बारीक चिरुन घ्या. टोमॅटोचेही तुकडे करायचे. हिरवी मिरची एकदम बारीक चिरायची. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या आणि कोथिंबीरही चिरुन घ्यायची. तसेच कोथिंबीरच्या काड्या फेकू नका. त्याही वापरा. सिमला मिरची धुवा आणि् मध्यम आकारात चिरुन घ्या.
२. एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे घ्यायचे. त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तसेच त्यात कोथिंहीरच्या काड्या घाला आणि लसणाच्या काही पाकळ्या घाला. आल्याचा तुकडा घाला आणि त्यात थोडे काजूही घाला. त्याची पेस्ट तयार करुन घ्या. घट्ट अशी पेस्ट करा.
३. एका कढईत किंवा पॅन मध्ये थोडे तेल गरम करायचे. त्यात जिरं घाला. जिरं छान तडतडल्यावर त्यात हिंग घाला तसेच बारीक चिरलेला कांदा घाला आणि मस्त परतून घ्यायचे. कांदा छान गुलाबी परतून झाल्यावर त्यात हिरवी मिरची घाला. नंतर तयार केलेली पेस्ट घाला. तसेच पेस्ट थोडा वेळ परतून घ्या आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यात लाल तिखट घाला. तसेच चवी पुरते मीठ घाला. थोडी साय घाला आणि ढवळून घ्या. छान रंग यायला लागला की थोडे पाणी घाला आणि एक वाफ काढून घ्या. हातावर थोडी कसूरी मेथी चुरा आणि भाजीत घाला. तसेच मक्याचे दाणे घाला आणि सिमला मिरचीचही घाला. त्यात गरजे पुरते पाणी घाला आणि झाकण ठेवा. सिमला मिरची मस्त शिजली की गॅस बंद करा. एकदम सोपी रेसिपी आहे. मात्र चवीला एकदम मस्त लागते. चपातीशी खा, तसेच भाकरीसोबतही खाऊ शकता. भाताशीही मस्तच लागेल.