कोथिंबीर थोडी का असेना पण जवळपास रोजच आपल्या स्वयंपाकात असते. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जेव्हा आपण कोथिंबीर घालतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्ही खुलून येतो. काही पदार्थ असे असतात की जे कोथिंबीरीशिवाय अगदी नकोसेच वाटतात. आता कोथिंबीरीच्या पानांमध्ये ही जी गंमत आहे, तीच गंमत तिच्या देठांमध्येही आहे. पण काही अपवाद सोडले तर बहुतांश घरांमध्ये काेथिंबीरीची पानं निवडून घेतली जातात आणि देठं कचऱ्यात टाकून दिली जातात (coriander stem chutney). पण असं करणं थांबवा. कारण पानांएवढीच पौष्टिक तिची देठंही असतात(simple recipe of making dhaniya chutney). त्या देठांची खूप छान चटणी करता येते. ती कशी करायची ते पाहूया..(kothimbirichi chutney recipe in Marathi)
कोथिंबिरीच्या देठांची चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी कोथिंबीरीची देठं. (देठाचा जेवढा भाग कोरडा असेल तेवढाच घ्यावा.)
पाव वाटी खोबरं
४ ते ५ हिरव्या मिरच्या
६ ते ७ लसूण पाकळ्या
काही केल्या कारल्याचा कडूपणा जात नाही? ३ टिप्स- कडू कारलं खमंग हाेऊन सगळ्यांनाच आवडेल..
अर्ध्या लिंबाचा रस
१ टीस्पून जिरे
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी कोथिंबीरीच्या काड्या धुवून चिरून घ्या आणि खोबऱ्याचे काप करून घ्या.
आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये थोडंसं तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर मिरच्या, कोथिंबीरीची देठं, लसूण पाकळ्या घालून एखादा मिनिट परतून घ्या.
८- १० तास सलग बसून काम केल्याने पाठीला बाक आला- खांदे झुकले? ३ उपाय- बॉडीपोश्चर सुधारेल
यानंतर परतून घेतलेले सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यातच जिरे आणि मीठ घाला. सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. तयार झालेली चटणी एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये लिंबू पिळा.
पाण्याच्या बाटलीला कुबट वास येतो? १ सोपा उपाय- बाटलीतला घाण वास १ मिनिटांत गायब
ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा मग तिला वरून पुन्हा तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता अशा पदार्थांची फोडणीही घालून खाऊ शकता.
फ्रिजमध्ये ठेवल्यास ही चटणी २ ते ३ दिवस चांगली टिकते. त्यानंतर ती तुम्ही एखाद्या रस्सा भाजीमध्ये वाटण म्हणूनही घालू शकता.