Join us

Cooking Tips : कुकरमध्ये डाळ शिजवताना ५ टिप्स वापरा; साध्या वरण-भाताची चव दुप्पट वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:35 IST

Cooking Tips : डाळ बनवताना तुमच्या हे लक्षात आलं असेल की कधी कधी प्रेशर कुकरमध्ये डाळ नीट शिजत नाही, तर कधी डाळ जळते.

वरण भाताशिवाय जेवणच  जात  नाही किंवा डाळ भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतचं नाही असे लोक असतात.  डाळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बहुतेक लोक आपल्या आहारात डाळीचा समावेश करतात. लोक अनेकदा डाळी बनवण्यासाठी प्रेशर कुकरची मदत घेतात. प्रेशर कुकरमध्ये डाळी बनवताना जाणूनबुजून किंवा नकळत लोक काही सामान्य चुका करतात. त्यामुळे डाळीची चव खराब होते. अशा स्थितीत काही चुका सुधारून तुम्ही उत्तम डाळ बनवू शकता. (Tricks of dal making Use these tips while cooking dal in the cooker)

डाळ बनवताना तुमच्या हे लक्षात आलं असेल की कधी कधी प्रेशर कुकरमध्ये डाळ नीट शिजत नाही, तर कधी डाळ जळते. त्यामुळे डाळींची टेस्टही बिघडते आणि भरपूर पोषक असूनही अनेकजण डाळीचे सेवन टाळताना दिसतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत डाळ बनवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही स्वादीष्ट  पदार्थ तयार करू शकता. 

कुकरमधून डाळ बाहेर आली की कुकर खराब होतो  पण कामही वाढते. अशा परिस्थितीत डाळी बाहेर येण्यामागील कारणांचा शोध घेतल्यास ही अडचण सहज टाळता येऊ शकते. कुकरमध्ये मसूर किंवा पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास किंवा गॅस बर्नर मोठा असल्यास डाळी बाहेर येण्याची भीती असते.

प्रेशर कुकरमध्ये कडधान्ये जळू नयेत म्हणून प्रथम कडधान्ये १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये डाळ टाकल्यावर चमच्याने डाळी हलवा. त्यामुळे डाळ कुकरच्या पृष्ठभागावर चिकटणार नाही. तसेच, डाळी शिजवण्यासाठी पुरेसे पाणी आणि जाड तळाचा प्रेशर कुकर वापरा.

अनेकदा रबर सैल झाल्यामुळे किंवा कुकरमध्ये शिट्टी न वाजल्याने दाब निर्माण होत नाही. चणा डाळ आणि मसूर डाळ इतर डाळींपेक्षा शिजायला जास्त वेळ घेतात. म्हणूनच कुकरमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना 1 तास पाण्यात भिजवा. तसेच, डाळी लवकर शिजण्यासाठी तुम्ही त्यात 1 चिमूट सोडा मिसळू शकता.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

डाळ गरम पाण्यात 15 मिनिटं किंवा साध्या पाण्यात अर्धा तास भिजवा. यानंतर कुकरमध्ये डाळ टाका आणि दुप्पट पाणी मिसळा. आता त्यात मीठ, हळद आणि अर्धा चमचा तेल घालून मंद आचेवर डाळ शिजवून घ्या आणि १ शिट्टी वाजल्यानंतर गॅस बंद करा. कुकरमधून पूर्ण प्रेशर बाहेर आल्यानंतरच कुकर उघडा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स