Lokmat Sakhi >Food > कोणतीही भाजी असो होईल चमचमीत, 'हा ' मसाला घाला - पाहा सोपी रेसिपी

कोणतीही भाजी असो होईल चमचमीत, 'हा ' मसाला घाला - पाहा सोपी रेसिपी

Cooking tips, homemade masala, Any vegetable will be delicious, add 'this' masala - see the easy recipe : झटपट करा कोणतीही रेसिपी. एकदाच करुन ठेवा हा टिकाऊ मसाला. करायला सोपा आणि चव एकदम चमचमीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2025 14:00 IST2025-07-27T13:59:34+5:302025-07-27T14:00:46+5:30

Cooking tips, homemade masala, Any vegetable will be delicious, add 'this' masala - see the easy recipe : झटपट करा कोणतीही रेसिपी. एकदाच करुन ठेवा हा टिकाऊ मसाला. करायला सोपा आणि चव एकदम चमचमीत.

Cooking tips, homemade masala, Any vegetable will be delicious, add 'this' masala - see the easy recipe | कोणतीही भाजी असो होईल चमचमीत, 'हा ' मसाला घाला - पाहा सोपी रेसिपी

कोणतीही भाजी असो होईल चमचमीत, 'हा ' मसाला घाला - पाहा सोपी रेसिपी

कोणतीही भाजी करायची म्हटलं की फार कष्ट घ्यावे लागतात. भाजी चविष्ट करायची असेल तर अनेकविध मसाले, पदार्थ त्यात घालावे लागतात. त्यासाठी चिराचिरी आणि खटाटोप करावा लागतो. (Cooking tips, homemade masala,  Any vegetable will be delicious, add 'this' masala - see the easy recipe)अर्थात त्यासाठी बाजारात आजकाल मसाले मिळतात. मात्र घरच्या मसाल्याची बातच काही वेगळी असते. कोणत्याही भाजीची चव वाढवेल असा मसाला आता घरीच तयार करा. पाहा कसा करायचा.  

साहित्य
दोन चमचे धणे, एक चमचा जिरे, दोन तमालपत्र, एक चक्री फुल, चार लवंग, चार ते पाच काळीमिरी, वाटीभर शेंगदाणे, तेल, वाटीभर सुकं खोबरं, अर्धी वाटी पांढरे तीळ, चार चमचे चणे किंवा डाळं, दोन काड्या कडीपत्ता, चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा आमचूर, अर्धा चमचा हिंग     

कृती
१. एका पॅनमध्ये सगळ्यात आधी धणे भाजून घ्यायचे. मंद आचेवर दोन ते पाच मिनिटे धणे भाजायचे. मग त्यात चमचाभर जिरे घालायचे आणि ते ही छान भाजायचे. धणे जिरे भाजून झाल्यावर त्यात दोन तमालपत्र आणि एक चक्री फुल घालायचे आणि मस्त भाजायचे. काहीच करपणार नाही याची काळजी घ्यायची. त्यात चार लवंगा घालायच्या आणि मग चार ते पाच काळीमिरीचे दाणे घालायचे. सगळे सुके मसाले छान परतून घ्यायचे. त्याचा खमंग वास आल्यावर एका ताटली मसाले काढायचे आणि गार करत ठेवायचे. 

२. त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचे. त्यावर वाटीभर शेंगदाणे छान परतून घ्यायचे. मग त्यात वाटीभर सुकं खोबरं घालायचं आणि छान परतायचे. शेंगदाण्याचा रंग बदलेल आणि खोबरंही जरा तांबूस होईल. मग त्यात अर्धी वाटी पांढरे तीळ घालायचे. तसेच मुठभर चणे घालायचे. चणे नको तर डाळं घाला. त्यामुळे मसाल्याला घट्टपणा येतो. छान मसाला तयार करायचा असेल तर सगळे पदार्थ योग्य परतले जाणे महत्त्वाचे.

३. सगळे पदार्थ काढून गार करत ठेवायचे. त्यात पॅनमध्ये कडीपत्ता परतून घ्यायचा. छान कुरकुरीत करायचा. मग जरा गार करत ठेवायचा. 

४. एका मिक्सरच्या भांड्यात पहीले परतलेले सुके मसाले घ्यायचे. त्याची सरसरीत पूड वाटून घ्यायची. छान कोरडी होते. सगळे पदार्थ छान वाटले जातात. मसाला एका खोलगट पातेल्यात काढायचा. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात इतर सामग्री घ्यायची. शेंगदाणे आणि दाण्याचे मिश्रण घ्यायचे. तसेच चमचाभर लाल तिखट,अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा आमचूर, अर्धा चमचा हिंग सगळे घ्यायचे आणि कडीपत्ता घ्यायचा. सरसरीत पूड वाटून घ्यायची. पातेल्यात काढलेल्या मसाल्यात मिक्स करायची. हाताने ढवळून सगळा मसाला एकजीव करायचा. हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे. 


  

Web Title: Cooking tips, homemade masala, Any vegetable will be delicious, add 'this' masala - see the easy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.