Join us

हेच बाकी होतं! पठ्ठ्यानं बनवलं चहा बिस्किट आईस्क्रीम; व्हिडिओ पाहून डोक्यावरच हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:47 IST

Cooking Tips : एका पठ्ठ्यानं चहा बिस्किट आईस्क्रीम तयार केलं आहे. (Chai Biscuits Ice cream recipe) यात पारले-जी बिस्कीटचा वापर केला आहे. 

आतापर्यंत तुम्ही अनेकप्रकारची आईस्क्रीम्स खाल्ली असतील. सोशल मीडियावर सध्या एक आगळं वेगळं आईस्क्रीम व्हायरल होत आहे. या आईस्क्रीमचं नाव ऐकून तुम्हीही बुचकळ्यात पडाल.  थंडीच्या दिवसात चहा खूप प्यायला जातो. चहा बरोबर बिस्किट्स खाल्ल्याशिवाय मन भरत नाही असे अनेकजण असतात. एका पठ्ठ्यानं चहा बिस्किट आईस्क्रीम तयार केलं आहे. (Chai Biscuits Ice cream recipe) यात पारले -जी बिस्कीटचा वापर केला आहे. 

सगळ्यात आधी त्यानं सपाट भागावर  चहा ओतला त्यानंकर बिस्टीक आणि दूध घालतं  हे पदार्थ बारीक करून त्याच लांबच लांबच रोल तयार केले.  त्यानंतर त्याचे वेगवेगळे भाग करून  रोल डब्यात भरले आणि त्यावर चॉकलेट लिक्विड घातलं. द बिअर्डेड फुडी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न