Join us

रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा चवदार फरसाण भाजी-झक्कास होईल बेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 15:35 IST

How to make farsan bhaji Cooking Hacks : चपाती किवा मऊ तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे.

रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच  खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट फरसाणची भाजी बनवू शकता. (Cooking Hacks) काहीतरी चटपटीत, खाल्ल्याचा फिल तुम्हाला येईल आणि पदार्थ पटकन बनून तयार होईल. (Farsan Bhaji Recipe)

चपाती किवा मऊ तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. फरसाणची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही फरसाणची भाजी बनवू शकता. (How to make farsan bhaji at home)

साहित्य

फरसाण - २ वाट्या

बारीक चिरेला कांदा - १

आलं- १ इंच

हळद- १ टिस्पून

लाल तिखट- १ टिस्पून

कोथिंबीर- २ ते ३ पानं

तेल - फोडणीसाठी 

कृती

१) एका कढईत तेल गरम करण्यास ठेवा. तेल गरम झालं की त्यात मोहोरी, जीरं आणि आलं, कांदा, टोमॅटो  घाला. कांदा टोमॅटो परतत असताना त्यात मीठ घाला. त्यानंतर  झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. 

२) हळद, लाल तिखट, चाट मसाला, धणेपूड घाला. त्यात थोडं पाणी  शिंपडून पुन्हा चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करा. तयार मिश्रणात फरसाण घालून मिक्स करा. 

३) त्यानंतर पुन्हा एक वाफ काढा मग गॅस बंद करा. तयार आहे चमचमीत,  चविष्ट फरसाणची भाजी. 

४) तुम्ही आवडीनुसार या भाजीत खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं वाटण आणि पाणी घालून रस्सा भाजी सुद्धा बनवू शकता.

फरसाणची रस्सा भाजी कशी बनवावी

फरसाणची रस्सा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात  भाजलेले कांदे, भाजलेले सुकं खोबरं, लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर घालून एक वाटण तयार करू घ्या.  नंतर कढईत तेल घालून हे वाटण घाला. वाटणात लाल तिखट, मीठ घालून तेलात शिजवून घ्या. नंतर यात पाणी घाला पाणी उकळ्यानंतर त्यात फरसाण घाला. नंतर २ मिनिटांनी गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स