भारतीयांना नाश्त्याचे पदार्थ कोणते असे विचारल्यास अनेकविध उत्तर मिळतील. वडापाव, भजीपाव, मिसळपाव, पराठा, मेदूवडा, इडली आणि असे अनेक पदार्थ आपल्याला आवडतात. (Coconut Sponge Dosa! If you want to eat something unique, make a soft dosa with fresh coconut, see the recipe) पोहे, उपमा तर घरोघरी केले जातातच. मात्र आणखी एक पदार्थ आहे जो नाश्त्याचा असला तरी जेवणातही केला जातो. तो म्हणजे डोसा. अनेक प्रकारचे डोसे केले जातात. त्यापैकीच एक मस्त प्रकार म्हणजे हा गोडसर नारळाचा डोसा. तांदूळ आणि नारळाच्या मिश्रणातून केला जाणारा हा मऊसर डोसा एकदा नक्की खाऊन पाहा.
साहित्य नारळ, तांदूळ, पाणी, साखर, पोहे, मेथीचे दाणे, तूप, मीठ, दूध
कृती१. रात्री एका पातेल्यात तांदूळ भिजत घालायचे. त्यासाठी आधी तांदूळ अगदी स्वच्छ धुवायचे. मग त्यात चार ते पाच मेथीचे दाणे घालायचे. जास्त दाणे घ्यायचे नाहीत. डोसे कडवट होतात. त्यामुळे चार दाणेच घाला. मेथीमुळे पीठ पटकन तयार करता येते. सकाळी तांदूळ जरा फुलले असतील. मग त्याचे पाणी काढायचे. थोडेच पाणी ठेवायचे.
२. सकाळी मुठभर पोहे भिजत घालायचे. पोहे तासभरच भिजवले तरी पुरे झाले. छान ताजा नारळ फोडायचा. नंतर खवायचा आणि त्याला थोडे दूध लावायचे. म्हणजे चार चमचे दूध नारळात घालायचे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ घ्यायचे. नारळ घ्यायचा. तसेच भिजवलेले पोहे त्यात घालायचे. अगदी थोडे पाणी घ्यायचे आणि दोन चमचे साखर घालालयची. मिक्सरमधून पीठ वाटून घ्यायचे. सगळे पदार्थ एकसमान वाटले जातील याची काळजी घ्यायची. पीठ मस्त व्यवस्थित तयार झाले की पातेल्यात काढून घ्यायचे. अति पातळ करायचे नाही. जरा घट्ट असेच पीठ करायचे.
३. एका तव्याला थोडे तूप लावायचे. त्यावर तयार पिठाचा डोसा लावायचा. जाडसर डोसा लावा. पातळ करायचा नाही. डोसा छान जाळीदार होतो. एकदम मऊसर आणि स्पंजी होतो. एकदम छान लागतो. दोन्ही बाजूंनी डोसा परतून घ्यायचा. दोन मिनिटे झाकण ठेवायचे आणि एक वाफही काढून घ्यायची.