ओल्या नारळाची चटणी हा दक्षिण भारतातील आणइ महाराष्ट्रातील एक महत्वाचा पदार्थ आहे. इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा, साबुदाणा वडा यांसारख्या पदार्थांसोबत ही चटणी आवडीनं खाल्ली जाते (Coconut Chutney Recipe). ही चटणी करण्यास अत्यंत सोपी असून कमीत कमी वेळेत तयार होते. नारळाची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Coconut Chutney)
नारळाची चटणी कशी करतात?
ही चटणी करण्यासाठी सर्वात आधी वाटीभर किसलेल्या ओल्या नारळाचा किस घ्या. यासोबत २ ते ३ हिरव्या मिरच्या घ्या. तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. यात अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घाला. मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित वाटून घ्या. चटणीला दाटपणा आणि चांगली चव येण्यासाठी यामध्ये पाव वाटी भाजलेले चणे किंवा डाळं घाला.
काही लोक यात लससूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीरही घालतात. ज्यामुळे चव अधिक वाढते. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडं पाण घालून अगदी बारीक करून घ्या. चटणीची कन्सिस्टंसी खूप पातळ नसावी ती थोडी दाटसर ठेवा.
चटणी वाटून झाल्यानतंर तिला फोडणी देणं महत्वाचे आहे. फोडणीसाठी एका लहान कढईत एक चमचा तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात अर्धा चमचा मोहोरी घाला. मोहोरी तडतडली की लगेच चिमूटभर हिंग, चार-पाच कढीपत्त्याची पानं घाला. त्यात १ ते २ लाल सुक्या मिरच्या घालून लगेच गॅस बंद करा.
ही तयार केलली खमंग फोडणी लगेच चटणीच्या मिश्रणावर ओता आणि चमच्यानं हलक्या हाताने एकत्र करा. यामुळे अप्रतिम सुगंध आणि चव येते. चटणीची चव अधिक आंबट करण्यासाठी तुम्ही यात थोडं, दही आणि लिंबाचा रस वापरू शकता ही ताजी आणि चविष्ट ओल्या नारळाची चटणी गरमागरम नाश्त्यासोबत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. ही चटणी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून तुम्ही दोन ते तीन दिवस सहज वापरू शकता. ही सोपी कृती वापरून तुम्ही घरच्याघरी हॉटेलसारखी चवदार नारळाची चटणी अगदी सहज बनवू शकता.
