Join us

फक्त अर्धा कप गव्हाच्या पीठाचा सॉफ्ट स्पाँजी झटपट केक, पाहा सोपी रेसिपी- केक होईल झकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:51 IST

Chocolate Mug Cake Recipe : सगळ्यात आधी  दही, गव्हाचं पीठ, गूळ, बेकींग पावडर, कोको पावडर, बेकींग सोडा, तेल, दूध हे जिन्नस एका  भांड्यात घेऊन एकत्र करा. 

नाताळच्या सणाची चाहूल लागताच बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, चॉकलेट्स दिसायला सुरूवात होते. कतीही नाही म्हटलं तरी केक खाण्याचा मोह काही आवरला जात नाही. (Easy Microwave Chocolate Mug Cake Recipe) खासकरून लहान मुलांना केक खाण्याचं खूप वेड असतं. केक म्हटलं की महागडं सामान आणून घरी केक बनवावा लागतो. इतकं सगळं करूनही कधी कधी केक फसतो.  हवीतशी बाजारासारखी चव केकला येत नाही. या लेखात मग केक तयार करण्याची  सोपी, झटपट रेसिपी पाहूया. (How to Make Mug Cake) 

साहित्य

दही - १/४ कप

गूळ - १/४ कप

तूप/तेल - २ चमचे

गव्हाचे पीठ - १/२ कप

कोको पावडर - १ टेस्पून

बेकिंग पावडर - १/२टीस्पून

बेकिंग सोडा - १ चिमूटभर

दूध - १/३ कप (गरजेनुसार)

चॉकलेट्स  (गरजेनुसार)

कृती

१) सगळ्यात आधी  दही, गव्हाचं पीठ, गूळ, बेकींग पावडर, कोको पावडर, बेकींग सोडा, तेल, दूध हे जिन्नस एका  भांड्यात घेऊन एकत्र करा. 

२) मिश्रण चांगलं फेटून घ्या. एकसंध झाल्यानंतर त्यात चॉकलेट्सचे क्यूब घाला. 

३)  तयार मिश्रण कपात भरून बेक करून घ्या. केक बेक झाल्यानंतर त्यावर लिक्विड चॉकलेट एड करा. तयार आहे सॉफ्ट, स्पॉजी मग केक.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स