पनीरची भाजी अनेकांच्या अतिशय आवडीची असते. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांनाच पनीर विशेष आवडते. आता पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या आपण नेहमीच करून खातो, पण यावेळी थोड्या वेगळ्या चवीचं पनीर खायचं असेल तर चीज पनीर घोटाळा ही रेसिपी ट्राय करून पाहा (how to make cheese paneer ghotala?). पनीरच्या भाजीचा हा एक अतिशय वेगळा प्रकार असून तो बच्चे कंपनीसह मोठ्या मंडळींनाही नक्कीच आवडेल.(easy and delicious recipe of cheese paneer ghotala)
चीज पनीर घोटाळा रेसिपी
साहित्य
२०० ग्रॅम पनीर
२ चमचे चीज
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
केस पातळ झाले? शाम्पू, तेल बदलून उपयोग नाही, 'हे' पदार्थ खा- केस होतील दाट
१ कांदा आणि १ सिमला मिरची
१ टीस्पून आलं, लसूण, मिरची पेस्ट
पावभाजी मसाला, चाट मसाला, तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, मीठ चवीनुसार
फोडणीसाठी बटर, तेल, जिरे, हळद आणि हिंग
कृती
चीज पनीर घोटाळा रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या.
थंडीमुळे पाय कोरडे पडून काळवंडले? घरच्याघरीच १५ मिनिटांत पेडिक्युअर करा- पाय होतील स्वच्छ, कोमल
यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला परतून झाला की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं, लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.
यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि सिमला मिरची घाला. थोडं पाणी घालून भाज्या वाफवून घ्या. त्यानंतर त्यात वेगवेगळे मसाले, मीठ घालून भाज्या मॅश करून घ्या. यानंतर त्यात किसलेलं पनीर, चीज आणि थोडं पाणी घाला. पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ येऊ द्या. मस्त चमचमीत चीज पनीर घोटाळा तयार..
