Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > घरीच करा अगदी रेस्टॉरंटसारखा चीज चिली टोस्ट! मुलांचे लाड करण्यासाठी सुपरटेस्टी पदार्थ..

घरीच करा अगदी रेस्टॉरंटसारखा चीज चिली टोस्ट! मुलांचे लाड करण्यासाठी सुपरटेस्टी पदार्थ..

Cheese Chilli Toast Recipe: चीज चिली टोस्ट खायला आवडत असेल तर त्याची पुढे सांगितलेली अगदी सोपी रेसिपी पाहा..(how to make cheese chilli toast?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 19:41 IST2026-02-03T16:19:59+5:302026-02-03T19:41:27+5:30

Cheese Chilli Toast Recipe: चीज चिली टोस्ट खायला आवडत असेल तर त्याची पुढे सांगितलेली अगदी सोपी रेसिपी पाहा..(how to make cheese chilli toast?)

cheese chilli toast recipe, how to make cheese chilli toast, restaurant style cheese chilli toast | घरीच करा अगदी रेस्टॉरंटसारखा चीज चिली टोस्ट! मुलांचे लाड करण्यासाठी सुपरटेस्टी पदार्थ..

घरीच करा अगदी रेस्टॉरंटसारखा चीज चिली टोस्ट! मुलांचे लाड करण्यासाठी सुपरटेस्टी पदार्थ..

Highlightsअगदी रेस्टॉरंटसारख्या चवीचा चीज चिली टोस्ट घरी तयार करता येतो. त्याचीच ही खास रेसिपी...

बऱ्याचदा असं होतं की दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यांच्यामध्ये बराच मोठा गॅप जातो आणि मग संध्याकाळी ५- ६ वाजेच्या दरम्यान थोडीशी भूक लागते. यावेळी चहासोबत खायला काहीतरी हवं असतं. मुलंही शाळेतून घरी आलेली असतात त्यामुळे त्यांनाही भूक लागलेली असते. शिवाय यावेळी असं काहीतरी खायचं असतं जे अगदी पोटभरीचं नसतं. त्यामुळे मग त्याचा परिणाम रात्रीच्या जेवणावर होत नाही. आता संध्याकाळची अशी छोटीशी भूक भागविण्यासाठी जर तुम्हाला काही खायचं असेल तर चीज चिली टोस्ट हा एक मस्त पर्याय आहे (how to make cheese chilli toast?). अगदी रेस्टॉरंटसारख्या चवीचा चीज चिली टोस्ट घरी तयार करता येतो (cheese chilli toast recipe). त्याचीच ही खास रेसिपी...(restaurant style cheese chilli toast)

चीज चिली टोस्ट रेसिपी

 

२ छोट्या वाट्या भरून बारीक चिरलेली सिमला मिरची, १ छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, १ चमचा कमी तिखट असणारी बारीक चिरलेली हिरवी मिरची, ३ वाट्या बारीक किसलेली चीज असं सगळं साहित्य एका पसरट भांड्यामध्ये एकत्र करा.

आठवड्यातून एकदा तरी 'हे' पदार्थ खायलाच हवे! वजन वाढण्याचं टेन्शनच नाही- नेहमीच राहाल फिट, एनर्जेटिक

त्यामध्ये बाजारात मिळणारं गार्लिक बटर, १ चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार थोडंसं मीठ, २ चमचे फ्रेश क्रिम आणि २ चमचे मेयोनिज घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित फेटून अगदी एकजीव करून घ्या.

 

यानंतर चीज चिली टोस्ट करण्यासाठी पावभाजी किंवा मिसळपाव यांच्यासाठी मिळणारे लादी पाव वापरा. पाव उभे उभे कापून घ्या. त्यानंतर त्यावर एका बाजुने आपण तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित लावून घ्या.

एक्झॉस्ट फॅनवर साचलेली चिकट घाण १० मिनिटांत गायब, पंखा होईल नव्यासारखा चकाचक, घ्या सोपा उपाय

गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्यावर चीज लावलेले लादी पावा ठेवा. ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर पाव एकाच बाजुने चांगले भाजून घ्या. गॅस अगदी मंद ठेवावा. नाहीतर पाव जळू शकतो. मस्त चटपटीत चीज चिली टोस्ट तयार. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. लहान मुलांसकट मोठ्या मंडळींनाही खूप आवडेल. 


 

Web Title : घर पर बनाएं रेस्टोरेंट जैसा चीज़ चिली टोस्ट: स्वादिष्ट शाम का नाश्ता

Web Summary : जल्दी और स्वादिष्ट नाश्ता चाहते हैं? यह चीज़ चिली टोस्ट रेसिपी घर पर रेस्टोरेंट जैसा स्वाद देती है। कटी हुई सब्जियां, पनीर और मसाले मिलाएं, ब्रेड पर फैलाएं और किसी भी समय के लिए एक बढ़िया नाश्ता बनाएं।

Web Title : Homemade Restaurant-Style Cheese Chilli Toast: A Delicious Evening Snack Recipe

Web Summary : Craving a quick, tasty snack? This cheese chilli toast recipe offers restaurant-quality flavor at home. Combine chopped veggies, cheese, and spices, spread on bread, and toast for a satisfying treat perfect for any time.