Join us  

फिटनेस फ्रिक विद्युत जामवाल वजन कमी करण्यासाठी खातो मुरमुऱ्याची भेळ! वाचा तो काय म्हणतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 11:40 AM

Check Out Vidyut Jamwal special Murmura Bhel recipe for Weight Loss : वजन कमी करताना उकडलेले पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, मुरमुऱ्याची हेल्दी भेळ करून पाहा

विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची खास ओळख फिट (Fit Actor) अभिनेता म्हणून केली जाते. त्याचा जगभरातल्या आघाडीच्या मार्शल आर्टिस्टमध्ये सामावेश आहे. व्यायामासह तो आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष देतो. त्याने अनेक वर्ष आपल्या फिटनेसला मेन्टेन ठेवलंय. शिवाय तो डाएटमध्ये कोणतीही तडजोड करीत नाही. पण कधी चटपटीत खायची इच्छा झाल्यास तो, आपली फेवरीट मुरमुऱ्याची भेळ खातो.

विद्युत जामवाल स्पेशल मुरमुऱ्याची भेळ (Murmura Bhel) करण्यासाठी अनेक हेल्दी साहित्यांचा वापर केला जातो. ज्यामुळे जिभेची चव तर वाढतेच, शिवाय अतिरिक्त वजनही वाढत (Weight Loss) नाही. त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर मुरमुऱ्याची भेळ करतानाची रेसिपी शेअर केली आहे. विद्युत जामवाल स्पेशल मुरमुऱ्याची भेळ कसा तयार करायचा पाहूयात(Check Out Vidyut Jamwal special Murmura Bhel recipe for Weight Loss).

विद्युत जामवाल स्पेशल हेल्दी मुरमुऱ्याची भेळ करण्यासाठी लागणारं साहित्य

मुरमुरे

बटाटे

टॉमेटो

काळे चणे

कांदा

कोथिंबीर

तेल

हिरवी मिरची

लाल तिखट

मीठ

कैरी

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये एक कप मुरमुरे घ्या. नंतर त्यात एक उकडून बारीक चिरलेला बटाटा, एक बारीक चिरलेला टॉमेटो, एक कप उकडून घेतलेले काळे चणे, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा तेल, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि एक चमचा बारीक चिरलेली कैरी घालून सर्व साहित्य चमच्याने मिक्स करा, व एका प्लेटमध्ये काढून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे विद्युत जामवाल स्पेशल हेल्दी मुरमुऱ्याची भेळ खाण्यासाठी रेडी. आपण ही भेळ सायंकाळी छोटी भूक भागवण्यासाठी खाऊ शकता. 

टॅग्स :विद्युत जामवालअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स