Join us

मऊ जाळीदार लोणी डोसा गरमागरम खाणं म्हणजे सुख! पाहा दावणगिरी डोसाची मस्त सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 14:18 IST

Check out this super easy Davangiri Dosa recipe : घरी करा विकतपेक्षा मस्त दावणगिरी डोसा. पाहा रेसिपी.

नाश्त्याला दाक्षिणात्य पदार्थ भारतात आवडीने खाल्ले जातात. इडली चटणी सांबार असेल किंवा मग मेदूवडा घरोघरी केला जातो. गल्लोगल्ली गाड्यांवर असे पदार्थ विकले जातात. ( Check out this super easy Davangiri Dosa recipe)काही ठिकाणी अप्पम फार फेमस आहे तर काही ठिकाणी दालवडा. डोसा तर सगळ्या शहरांमध्ये असतोच असतो. गावात जा किंवा मोठ्या शहरात साऊथ इंडियन फूड सगळीकडे उपलब्ध आहे. दावणगिरी लोणी डोसा मात्र सहसा सगळीकडे मिळत नाही. काही ठराविक शहरांमध्ये मिळतो. ( Check out this super easy Davangiri Dosa recipe)करायला अगदी सोपा आहे फार मऊ होतो पाहा रेसिपी.

साहित्यतांदूळ, उडदाची डाळ, साबुदाणा, जाडे पोहे, मीठ, तूप, लोणी, पाणी , मेथीचे दाणे 

प्रमाणजर चार वाट्या तांदळाचे पीठ घेत असाल तर एक वाटी उडदाची डाळ घ्या. अर्धी वाटी साबुदाणा घ्या आणि एक वाटी जाडे पोहे घ्या.

कृती१. एका खोलगट पातेल्यात चार वाट्या तांदूळ घ्या. त्यामध्ये वाटीभर उडदाची डाळ घाला. अर्धी वाटी साबुदाणा घाला. आता ते मिश्रण व्यवस्थित धुऊन घ्या. एका दुसऱ्या पातेलीत वाटीभर जाडे पोहे घ्या. ते छान धुऊन घ्या. तांदूळ व डाळ नीट धुऊन झाल्यावर त्यामध्ये पोहे घाला. त्यामध्ये चमचाभर मेथीचे दाणे घाला. 

२. त्यामध्ये पाणी ओता. सगळं मिश्रण व्यवस्थित भिजेल याची काळजी घ्या. पाणी जरा जास्त ठेवा. किमान चार तासांसाठी तरी भिजायला हवे. रात्रभर भिजवले तर उत्तमच.

३. भिजल्या नंतर ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता आणि छान वाटून घ्या. त्यामध्ये भिजवण्यासाठी वापरलेले पाणी घालायचे नाही. वेगळे पाणी अगदी थोडी घाला. बॅटर जरा जाडसरच ठेवा. त्यामध्ये मीठ घाला. चमच्याच्या मदतीने किंवा मग फेटण्यासाठी मिळणाऱ्या यंत्राने ते मिश्रण छान मऊ करुन घ्या. 

४. पॅन घ्या किंवा मग खोलगट तवा. डोसा लावल्यावर तो छान झाकता येईल असा तवा घ्या. तो छान तापवून घ्या. मग त्यावर थोडे तूप सोडा आणि जाडसर असा लहान डोसा लावा. त्याला जाळी पडेल मग झाकून ठेवा आणि शिजू द्या. नंतर उलथा आणि दोन्ही बाजू  परतून घ्या. त्याला भरपूर लोणी लावा आणि आवडत्या चटणीसोबत खा.     

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नपाककृतीकिचन टिप्स