Lokmat Sakhi >Food > पाहा नारळ- काकडीची मस्त चविष्ट चटणी - करायला सोपी आणि चवीला भन्नाट

पाहा नारळ- काकडीची मस्त चविष्ट चटणी - करायला सोपी आणि चवीला भन्नाट

Check out this delicious coconut-cucumber chutney - Indian recipes, easy to make and delicious to taste : करायला सोपी आणि चविला मस्त अशी ही चटणी एकदा नक्की करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 12:26 IST2025-06-15T12:23:41+5:302025-06-15T12:26:54+5:30

Check out this delicious coconut-cucumber chutney - Indian recipes, easy to make and delicious to taste : करायला सोपी आणि चविला मस्त अशी ही चटणी एकदा नक्की करा.

Check out this delicious coconut-cucumber chutney - Indian recipes, easy to make and delicious to taste | पाहा नारळ- काकडीची मस्त चविष्ट चटणी - करायला सोपी आणि चवीला भन्नाट

पाहा नारळ- काकडीची मस्त चविष्ट चटणी - करायला सोपी आणि चवीला भन्नाट

चटणी हा पदार्थ घरोघरी खाल्ला जातो. इडली, डोसा, पराठा, थालीपीठ किंवा इतर कोणतेही पदार्थ आपण नुसते खात नाही. त्या सोबत छान चविष्ट चटणी असली की खायला मज्जाच येते. (Check out this delicious coconut-cucumber chutney -  Indian recipes, easy to make and delicious to taste)चटणी करायच्या अनेक पद्धती असतात. विविध रंगाच्या आणि विविध पदार्थांच्या चटणी भारतभरातून केल्या जातात. त्यापैकीच एक चटणी म्हणजे काकडीची चटणी. करायला सोपी आणि चवीला अगदी वेगळी असते. एकदा नक्की करुन पाहा.    


साहित्य 
काकडी, मीठ, कोथिंबीर, लसूण, तेल, डाळं, आलं, नारळ, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता 

कृती
१. छान ताजी काकडी सोलून घ्यायची. खाऊन पाहायची कडू नसलेली छान गोड काकडी घ्यायची. काकडीचे तुकडे करायचे. कोथिंबीर छान बारीक चिरुन घ्यायची. ताजा नारळ घ्यायचा. नारळ छान खवायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. 

२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरीचे दाणे घालायचे. मोहरी छान तडतडली की त्यात थोडे जिरे घालायचे. जिरे फुलल्यावर त्यात चमचाभर हिंग घालायचे. त्यात थोडे डाळे घालायचे. डाळ छान खमंग परतायचं.  सगळे पदार्थ छान परतून झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसूण परतून घ्यायचा. त्यात नारळ घालायचा नारळ नसेल तर सुके खोबरे घालायचे.      

३. त्यात काकडीचे तुकडे घालायचे आणि अगदी दोन मिनिटे परतायचे. परतून झाल्यावर गॅस बंद करायचा. सगळे पदार्थ गार करत ठेवायचे. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. त्यात अगदी थोडे पाणी घालायचे. मगच वाटायचे. मात्र पाणी जास्त नाही घ्यायचे. काकडीला भरपूर पाणी सुटते. चटणी अगदी पातळ होईल. पाणी घातले नाही तरी चालेल. 

४. एका फोडणीपात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान परतला की गॅस बंद करायचा आणि त्यात हळद घालायचे. तसेच तिखट घालायचे. फोडणी ढवळायची आणि मग चटणीमध्ये ओतायची. अशी चटणी एकदा नक्की खाऊन पाहा. 

Web Title: Check out this delicious coconut-cucumber chutney - Indian recipes, easy to make and delicious to taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.